घरातील पालींना पळवून लावण्यासाठी सोपे घरगुती उपाय, पालींचा पुन्हा होणार नाही त्रास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 10:41 AM2019-11-16T10:41:50+5:302019-11-16T10:43:37+5:30
प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते.
प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते. कधी कधी तर पाल ही आपल्या कपड्यांमध्येही जाते आणि मग ती काढायची कशी प्रश्न पडतो. अशात आज आम्ही तुम्हाला घरातील पाल कशी पळवून लावायची याचे काही घरगुती टिप्स देत आहोत.
१) घरातील ज्या जागांवर पाल सर्वात जास्तवेळा येते, त्या जागेवर एक कांदा कापून ठेवा. कांद्याच्या दर्पामुळे पाल घरात येत नाही.
२) घरातील कोपऱ्यांमध्ये मिरची पावडर स्प्रे केल्याने पाल घरातून पळून जातात. हा पाल पळवून लावण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.
३) काळ्या मिरीची पावडर भिंतीवर शिंपडल्यास घरात पाल पुन्हा कधीही येणार नाही.
४) लसणाचा दर्पही पालींसाठी असह्य असतो. त्यामुळे लसणाचाही वापर तुम्ही करु शकता.
५) कॉफी पावडर तंबाखू पावडरमध्ये मिश्रित करुन पाल येतात त्या ठिकाणांवर ठेवा. पाल पुन्हा येणार नाही.
६) असे सांगितले जाते की, अंड्याची साल घरात ठेवल्यास घरात पाल येत नाही. दर 3 ते 4 दिवसांनी ही अंड्याची साल बदलायला हवी.
७) बर्फाचं थंड पाणी पालीवर स्प्रे करा. आठवड्यातून काही दिवस असे केल्यास पाल पुन्हा घरात येणार नाही.
८) फ्लायपेपर म्हणजे माशांना चिकटवून पकडण्यासाठी वापरण्यात येणारा एक चिकट कागद. फ्लायपेपर तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन मिळतील. भिंतींना फ्लायपेपर चिटकवून ठेवा आणि पाली जर त्याला चिकटल्या तर तुमच्या तावडीत सापडल्या असे समजा.