पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 02:47 PM2019-03-08T14:47:43+5:302019-03-08T14:49:51+5:30

पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो आणि त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे म्हटलं की त्यांची बातच और... पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात.

Tips to maintain white colour of clothes | पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!

पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : Housekeeping - WonderHowTo)

पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो आणि त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे म्हटलं की त्यांची बातच और... पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात. कारण फक्त वढचं नाही हा, अनेकदा या कपड्यांचा रंग पिवळा पडतो आणि त्यांची चमकही नाहीशी होते. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरिही त्यांची चमक परत येत नाही. तुमचाही आवडता रंग पांढरा आहे तरी तुम्ही या रंगाचे कपडे खरेदी करणं टाळत असाल तर आम्ही तुम्हाला पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पांढऱ्या कपड्यांची चमक आणि त्यांच्यावरील डाग दूर करू शकता. 

पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही टिप्स :

- पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी एक बादली पाण्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब एकत्र करून त्यामध्ये कपडे 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे कपड्यांवर आलेला पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते. 

- कपडे 30 मिनिटांसाठी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्यामध्ये ब्लीच पावडर एकत्र करा. या ब्लीच असलेल्या पाण्यामध्ये कपडे 15 मिनिटांपर्यंत भिजत ठेवा. या 15 मिनिटांमध्ये ब्लीच कपड्यांवर लागलेले डाग काढून टाकण्यास मदत करतं. 

- पांढरे कपडे धुतल्यानंतर ते अर्ध्या बादली पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस एकत्र करून काही वेळापर्यंत भिजत ठेवा. यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक परत येण्यास मदत होइल. 

- पांढऱ्या कपड्यांना नेहमी रंगीत कपड्यांसोबत न धुता वेगळं धुवा. रंगीत कपड्यांसोबत पांढरे कपडे धुतल्याने ते पिवळे दिसू लागतात. 

- कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी ब्लीचिंग दरम्यान वॉशिंग सोडा आणि दुसऱ्या कोणत्याही डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता. यामुळे कपड्यांचा रंग टिकून राहण्यास मदत होते. 

- धुतल्यानंतर कपडे उन्हामध्ये सुकवा. त्यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक वाढण्यास मदत होते. तसेच कपड्यांवर पिवळसरपणा येत नाही. 

Web Title: Tips to maintain white colour of clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.