तळघरात २२० वर्षांनी मिळाली टीपू सुलतानची बंदूक आणि तलवार, लवकरच होणार लिलाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:55 PM2019-03-11T12:55:23+5:302019-03-11T12:59:47+5:30

या परिवाराचे पूर्वज मेजर थॉमस हार्ट, ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत एक सेना अधिकारी होते.

Tipu Sultan artefacts found after 220 years will auction in Britain | तळघरात २२० वर्षांनी मिळाली टीपू सुलतानची बंदूक आणि तलवार, लवकरच होणार लिलाव!

तळघरात २२० वर्षांनी मिळाली टीपू सुलतानची बंदूक आणि तलवार, लवकरच होणार लिलाव!

Next

ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची काही शस्त्रे सापडली आहेत. लवकरच या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. या परिवाराचे पूर्वज मेजर थॉमस हार्ट, ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत एक सेना अधिकारी होते. १७९८ ते ९९ मध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या अॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर काही कलाकृती आणि हत्यारे घरी घेऊन आले होते. त्यातीलच हे शस्त्रे आहेत.

पिढ्यांनी सांभाळून ठेवल्या वस्तू

२६ मार्च रोजी या शस्त्रास्त्रांचा लिलाव केला जाणार आहे. टीपू सुलतानची एक फ्लिंटलॉक गन आणि स्वर्णजडीत तलवारीसहीत आठ दुर्मिळ शस्त्रांचा यात समावेश आहे. १७९९ मध्ये सेरिंगपटममध्ये युद्धादरम्यान टीपू सुलतानचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे मेजर थॉमस हार्ट यांनी ही हत्यारे सोबत घेतली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या पिढ्यांनी या वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या.

हैदर अलीची सोन्याची तलवार

ज्या शस्त्रांचा लिलाव होणार आहे त्यात टीपू सुलतानची बंदूक आहे. त्यासोबतच त्याचे वडील हैदर अलीची सोन्याची तलवारही यात आहे. तसेच एका सुपारी ठेवण्याचा सोन्याचा डबाही आहे. यात अजूनही तीन सुपाऱ्या आहेत. 

भारताला परत द्याव्या वस्तू

एंथनी क्रिब म्हणाले की, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला पैशांमध्ये काहीच रस नाही. त्यांना असं वाटतं की, या वस्तू भारताला परत द्याव्यात. कदाचित एखाद्या संग्रहालयाने हे विकत घ्यावेत. जेणेकरून येणारी पिढी यातून काही शिकू शकेल. खरंतर याबाबत खुलासा जानेवारीमध्ये झाला होता. तेव्हा या परिवाराने तळघरात मिळालेल्या एका तलवारीची माहिती एंथनी क्रिब लिमिटेडला संपर्क केला होता. 

Web Title: Tipu Sultan artefacts found after 220 years will auction in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.