दिरंगाईला कंटाळून महिलेने न्यायालय परिसरात कपडे काढण्यास केली सुरुवात
By admin | Published: October 19, 2016 02:44 PM2016-10-19T14:44:08+5:302016-10-19T14:44:08+5:30
गुजरातमधील अहमदाबाद न्यायालयात सुरु असलेल्या वेळखाऊ प्रक्रियेला कंटाळून एका महिलेने चक्क कपडे काढून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 19 - गुजरातमधील अहमदाबाद न्यायालयात सुरु असलेल्या वेळखाऊ प्रक्रियेला कंटाळून एका महिलेने चक्क कपडे काढून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. इन्कम टॅक्स सर्कलजवळील सत्र न्यायालय परिसरात महिलने कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेतच महिलेला रोखण्यात आलं.
वतवा येथे राहणा-या या महिलेने गेल्यावर्षी आपल्या पतीविरोधात तक्रार केली होती. आपल्या मुलीसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप महिलेने केला होता. एफआयआर दाखल होऊन वर्ष झालं तरी न्यायालय सुनावणीसाठी माझ्या आरोपी पतीला हजर करु शकलेलं नाही असा आरोप महिलेने केला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीने दिल्लीला पळ काढला होता.
न्यायालय परिसरात महिलेने दंगा करत कपडे काढण्यास सुरुवात केली तेव्हा महिला सुरक्षारक्षक आणि वकिलांनी धाव घेत तिला रोखलं. महिलेसोबत असणारा एक व्यक्ती या घटनेचं चित्रीकरण करत होता. दोघांनाही रजिस्ट्रारकडे नेण्यात आलं. तिथे दोघांनीही माफी मागत पुन्हा असं काही करणार नसल्याचं आश्वासन दिलं.