बोंबला! पत्नीच्या टीकटॉक व्हिडीओंना कंटाळला पती, थेट घटस्फोटासाठी गेला कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:34 PM2020-01-27T12:34:43+5:302020-01-27T12:37:06+5:30
आजकाल सगळ्याच ठिकाणी टीकटॉकचा क्रेज पहायला मिळतो
आजकाल सगळ्याच ठिकाणी टीकटॉकचा क्रेज पहायला मिळतो. प्रसिध्दी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा तुफान वापर केला जातो. याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. सोशल मिडीयामुळे अनेक नाती तुटत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत.
ही घटना गाझियाबाद येथील आहे. याठिकाणी एका पतीने आपल्या पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. याचे कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. कारण त्या व्यक्तीची पत्नी मोबाईलवर सतत टिकटॉकचा वापर करत असल्यामुळे त्याने नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलाचे असे म्हणणे आहे की सोशल मीडियाच्या अतिवापराच्या त्याच्या कुटूंबावर परिणाम होत आहे. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे व्यक्ती आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे घरातील वातावरण अनूकुल राहत नाही. तसंच जर कम्यूनिकेशन गॅप जास्त असेल तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
सोशल मीडियाचं व्यसन लागल्यानंतर फिलिंग्स शेअर करण्यासाठी किंवा पार्टनर सोबत वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे पती किंवा पत्नीच्या आयुष्यात असुरक्षिततेची भावना यायला सरूवात होते. तसंच आपल्या पार्टनरला असं सुद्धा वाटू शकतं की तुमच्यासाठी मोबाईल सगळं काही असून मोबाईला तुम्ही जास्त वेळ देत आहात. यामुळे पार्टनरसोबत वारंवारं भांडण होऊन नातं तुटू शकतं. किंवा तुमचा पार्टनर तुमच्या बाबतीत असंवेदनशील सुद्धा होऊ शकतो. एकमेकांमध्ये संवादाचा अभाव असणे. असुरक्षितता वाटणे अशा गोष्टींमुळे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या नात्यातील ताण वाढण्याची शक्यता असते. मग नंतर दोघं ही आपल्या नात्याला डोकदुखी समजायला लागतात.
(image credit- readers digest)
अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये अनेकदा समजावून सांगितल्यावरही पती पत्नी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवतात. गाझियाबादच्या या घटनेत गरजेपेक्षा जास्त पार्टनर सोशल मीडीयावर एक्टीव्ह राहिल्यामुळे पार्टनरला हा निर्णय घ्यावा लागला. याबाबत या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या विरोधात कोर्टात याचीका दाखल केली आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या चुकिच्या वापरामुळे लोकांची नाती तुटतात. पण त्यांना या गोष्टींची जराही खंत वाटत नसते. याचा अर्थ असा होतो की सोशल मीडियावर अधिक वेळ घालवण्याइतकी नाती मह्त्वाची वाटत नाहीत. ( हे पण वाचा-म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....)
(image credit- readers digest)
सोशल मीडियाचा अधिक वापर करून जास्त विव्ज आणि प्रसिध्दी मिळवण्याकरिता लोकं काहीही करू शकतात. त्याचा वाईट परिणाम नात्यांवर होऊन नकळतपणे तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असंच घडत असेल तर तुम्हाला कांऊन्सलिंग करण्याची गरज आहे. तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून सोशल मीडियाचा अतिवापर करणं टाळा आणि आपल्या घरच्या व्यक्तींना किंवा पार्टनरला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-पार्टनरसोबत डेटला जायचयं पण बजेट कमी? 'या' टीप्स वापराल स्वस्तात मस्त होईल डेट)