Titanic जहाजाच्या मलब्यात आढळून आली एक मौल्यवान वस्तू, बुडण्याच्या 111 वर्षानंतर चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 09:22 AM2023-05-27T09:22:29+5:302023-05-27T09:27:09+5:30
Gold Necklace in Titanic : आजही या जहाजाबाबत काही माहिती समोर आली तर लोक लक्ष ठेवून असतात. अशातच एक माहिती समोर आली आहे. टायटॅनिक जहाजाच्या मलब्यात एक मूल्यवान वस्तू सापडली आहे.
Mystery Of Titanic: टायटॅनिक जहाज बुडणं ही जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्घटनांपैकी एक आहे. या घटनेला 111 वर्ष उलटून गेली आहेत, तरी आजही या जहाजाबाबत लोकांमध्ये चर्चा होते. अनेक कहाण्या समोर येऊनही आजही लोकांना या जहाजाबाबत ऐकायला-वाचायला आवडते. या दुर्घटनेत हजारो लोकांचा जीव गेला होता. आजही या जहाजाबाबत काही माहिती समोर आली तर लोक लक्ष ठेवून असतात. अशातच एक माहिती समोर आली आहे. टायटॅनिक जहाजाच्या मलब्यात एक मूल्यवान वस्तू सापडली आहे.
इंडिपेंडेंटच्या एका रिपोर्टनुसार, एका शोधाच्या माध्यमातून टायटॅनिक जहाजाच्या मलब्यामध्ये एक सोन्याचा मौल्यवान हार सापडला आहे. या हाराची सगळ्यात खास बाब म्हणजे हा दुर्मिळ हार शार्कच्या दातापासून तयार करण्यात आला होता. असं सांगण्यात आलं की, हा हार तेव्हा आढळून आला जेव्हा एका अंडरवॉटर स्कॅनिंग प्रोजेक्टच्या माध्यमातून टायटॅनिकचे अद्भूत फोटो काढण्यात आले. या प्रोजेक्टमध्ये एकूण 7 लाख फोटो काढण्यात आले आणि या मलब्याचं एक स्कॅन बनवण्यात आलं. यातच हा हार आढळून आला.
रिपोर्टनुसार, हा सोन्याचा हार मेगाडॉन नावाच्या शार्क दातापासून बनवला होता. हा एक दुर्मिळ मासा असायचा जो आता लुप्त झाला आहे. या फोटोंमध्ये तो दातही स्पष्ट दिसत आहे. प्रोजेक्टचे अधिकारी रिचर्ड पार्किंसन म्हणाले की, हा शोध फार सुंदर आणि आनंद देणारा आहे. पण हार तिथून काढण्यात अनेक समस्या आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेच्या एका करारामुळे मलबा तिथून हटवला जाऊ शकत नाही. तरीही प्रोजेक्टवर काम करणारी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने त्या परिवाराचा शोध घेत आहेत ज्यांचा हा हार होता.
असं सांगण्यात येत आहे की, यादरम्यान एआय हा हार घालणाऱ्या महिलेला शोधू शकतं. जर असं झालं तर हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. एका दुसऱ्या रिपोर्टमध्ये या प्रोजेक्टबाबत सांगण्यात आलं. एका व्हिडिओमध्ये टायटॅनिकचा पूर्ण मलबा दिसत आहे. असं समजतं की, टायटॅनिक दोन भागांमध्ये आहे. अशात या प्रोजेक्टने टायटॅनिकच्या मलब्याबाबत अनेक अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या काळात आणखी काही किंमती वस्तू शोधता येऊ शकतील, ज्या अजूनही मलब्यातून काढण्यात आलेल्या नाही.