टायटॅनिकच्या चावीचा ७0 लाख रुपयांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 01:01 AM2017-04-16T01:01:04+5:302017-04-16T01:01:04+5:30

आख्यायिका बनलेले टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्या समुद्र सफरीसाठी रवाना झाले; मात्र कधीच परत आले नाही. या जहाजाबाबत सगळ्यांनाच माहिती आहे

Titanic's auction of 70 lakh rupees | टायटॅनिकच्या चावीचा ७0 लाख रुपयांचा लिलाव

टायटॅनिकच्या चावीचा ७0 लाख रुपयांचा लिलाव

googlenewsNext

डेव्हिजेस : आख्यायिका बनलेले टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्या समुद्र सफरीसाठी रवाना झाले; मात्र कधीच परत आले नाही. या जहाजाबाबत सगळ्यांनाच माहिती आहे; मात्र या जहाजाची भक्कम चावी नुकतीच ८५ हजार पौंड म्हणजेच सुमारे ७0 लाख रुपयांना लिलावात विकली गेली. ही चाबी टायटॅनिकच्या लाईफ जॅकेट लॉकरची होती. डेव्हिजेसमध्ये झालेल्या या लिलावात टायटॅनिकशी संबंधित इतरही काही वस्तू विकल्या गेल्या. सुमारे २00 वस्तूंचा त्यात समावेश होता. टायटॅनिकशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज लिलावात सहभागी झाले होते. त्यात ही चावी सर्वाधिक किमतीत विकली गेली. लिलावात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की, या चावीची किंमत ५0 हजार पौंड ठरविण्यात आली होती; मात्र ती खरेदी करू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक होती.
त्यांनी बोली वाढवतच नेली. त्यामुळे अंतिमत: ८५ हजार पौंडांना (७0 लाख रुपये) ती विकली गेली.टायटॅनिक जहाज १४ एप्रिल १९१२ रोजी अ‍ॅटलांटिक समुद्रातील एका विशाल हिमखंडास धडकले होते. या अपघातात चालक दलाच्या सदस्यांसह १,५00 लोक मृत्युमुखी पडले होते. या भयानक अपघातातून ७१0 जण वाचले होते.

Web Title: Titanic's auction of 70 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.