'या' पार्कमध्ये न्यूड झाल्याशिवाय मिळत नाही एन्ट्री, तसेच मनसोक्त फिरतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 04:06 PM2023-10-31T16:06:41+5:302023-10-31T16:09:30+5:30

Nude Park Paris : आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगणार आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात.

To go to the nude zone of the Bois de vincennes park Paris one has to take off all the clothes | 'या' पार्कमध्ये न्यूड झाल्याशिवाय मिळत नाही एन्ट्री, तसेच मनसोक्त फिरतात लोक!

'या' पार्कमध्ये न्यूड झाल्याशिवाय मिळत नाही एन्ट्री, तसेच मनसोक्त फिरतात लोक!

Nude Park Paris : शहरांमध्ये जागोजागी पार्क आहेत. लोक फिटनेससाठी, फिरण्यासाठी पार्कमध्ये जातात. लहान मुले खेळण्यासाठी जातात. एक्सरसाइज किंवा रनिंग करणारे लोक पार्कमध्ये जाण्यासाठी लोक स्पोर्ट्स ट्रॅक सूट घालतात. पण असाही काही नियम  नसतो. तुम्ही कोणतेही कपडे घालून पार्कमध्ये जाऊ शकता. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगणार आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात. म्हणजे महिला असो वा पुरूष इथे कपडे घालून जाऊ शकत नाहीत.

 कुठे आहे हा पार्क?

एका रिपोर्टनुसार, हा पार्क फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (Paris) आहे. पॅरिसमधील पब्लिक पार्क 'बोइस दे विंसेन्स' मधील एक भाग न्यूड क्षेत्रासाठी ठेवला आहे. या पार्कमध्ये तुम्ही न्यूड होऊन फिरू शकता.  हा पार्क खासकरून न्यूड राहणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला आहे. इथे लोक आपल्या मनानुसार फिरतात आणि न्यूड होऊन फिरतात. याने त्यांना स्वतंत्र वाटतं आणि यासाठी त्यांना कोणत्याही बीचवर जाण्याची गरज नाही.

सुरक्षा व्यवस्था

या पार्कची सर्वात खास बाब म्हणजे इथे सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली आहे. इथे कुणीची चुकीचं काही करू शकत नाही. असं झालं तर कठोर कारवाई केली जाते. या पार्कबाबत अधिकारी म्हणाले की, हा पार्क न्यूडिस्ट जोन पार्कजवळ आहे आणि याचा आकार एका फुटबॉल ग्राउंड इतका आहे.

इथे न्यूड होऊन फिरणाऱ्या लोकांना कुणीची त्रास देत नाही. सुरूवातीला हा पार्क प्रयोग म्हणून सुरू करण्यात आला होता. पण याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा पार्क पुढे सुरू ठेवला गेला. या पार्कमध्ये येण्यासाठी एक ठराविक वेळही ठरवण्यात आली आहे.

Web Title: To go to the nude zone of the Bois de vincennes park Paris one has to take off all the clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.