गर्लफ्रेंड मिळवण्याची विचित्र क्रेझ; पाय 5 इंच वाढवण्यासाठी केली शस्त्रक्रिया, खर्च केले दीड कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 05:06 PM2023-04-12T17:06:14+5:302023-04-12T17:14:20+5:30
एक अतिशय धोकादायक शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही पाय 5 इंच वाढवले जेणेकरून ते लांब दिसू शकतील.
गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी काही लोक वाटेल ते करतात. कमी उंची असल्याने मुली भाव देत नाहीत म्हणून एका व्यक्तीने चक्क दोन्ही पाय लांब करण्याचा निर्णय घेतला आहे. एक अतिशय धोकादायक शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही पाय 5 इंच वाढवले जेणेकरून ते लांब दिसू शकतील. यावर 170,000 डॉलर्स म्हणजेच तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आता या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे 41 वर्षीय मूसा गिब्सन सध्या चर्चेत आहे. कारण आणखी धक्कादायक आहे. मूसाने सांगितले की, मी 5 फूट 5 इंच आहे. कमी उंचीमुळे त्याला लाज वाटायची. माझी गर्लफ्रेंड यामुळे निघून गेली. इतर मुलींनी भाव काही दिला नाही. मी स्वतःचा तिरस्कार करू लागलो. आत्मविश्वास संपला होता. मी बरेच प्रयत्न केले. मला उंच दिसावे म्हणून मी माझ्या पायात कपडे वगैरे ठेवत असे पण तेही चालले नाही.
उंची वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले
हताश गिब्सनने उंची वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. इंटरनेटवरून अशा गोळ्या विकत घेतल्या ज्यात दावा केला होता की काही गोळ्या घेतल्याने उंची वाढेल, पण काही उपयोग झाला नाही. तसेच अनेक जादूटोणा करणारे लोक भेटले. उपचाराच्या सर्व पद्धती आजमावून पाहिल्या पण काहीच झाले नाही. शेवटी पायाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. ते खूप वेदनादायक होते पण तो शेवटचा उपाय देखील होता.
पैसे कमी होते म्हणून दिवसरात्र केलं काम
मूसाने सांगितले की, त्याच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते म्हणून त्याने रात्रंदिवस काम केले. दिवसा एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करायचे आणि रात्री उबर कार चालवायचा. यामुळे तीन वर्षांत $75,000 जमा झाले. 2016 मध्ये पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे उंची 3 इंचांनी वाढली. म्हणजेच आता लांबी 5 फूट 8 इंच झाली आहे. यामुळे मूसाला खूप आनंद झाला. त्याला अजून वाढवायची होती. या वर्षी मार्चमध्ये दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यावर आणखी 98,000 खर्च झाला. आता त्याची उंची 2 इंचांनी वाढेल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"