आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च
By admin | Published: March 12, 2016 02:10 PM2016-03-12T14:10:55+5:302016-03-12T14:14:18+5:30
86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला
Next
ऑनलाइन लोकमत
86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला आणि महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू करत जनआंदोलन आजच्या दिवशी सुरू केलं.
मिठावरील कराचा सर्वाधिक फटका गरीबांना बसणार होता त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना शांततेच्या मार्गाने ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी महात्मा गांधींनी या घटनेचा वापर केला आणि कायदेभंग आंदोलन उभारले.
साबरमतीहून 78 सहकाऱ्यांसोबत महात्मा गांधींनी 241 मैल दूर असलेल्या दांडी या समुद्रकिनारी वसलेल्या गावाकडे चालायला सुरूवात केली. ज्यावेळी 5 एप्रिलला ते तिथे पोचले त्यावेळी या जनआंदोलनात सहभागी झालेल्यांची संख्या लाखाच्या घरात होती. तिथं मिठ उचलत सत्याग्रहींनी कायदेभंग केला. पोलीसांनी जवळपास 60 हजार सत्याग्रहींना अटक केली.
21 मे रोजी सरोजिनी नायडू यांनी 2500 सत्याग्रहींसह धरासना मिठागारात सत्याग्रह केला. हे लोण नंतर पसरत गेलं, ज्याची परिणिती स्वातंत्र्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात झाली.
Saluting all those who joined the Dandi March, following Bapu's clarion call and inspired by his ideals. pic.twitter.com/gvHRfexNrj
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2016