गेल्या ४७ वर्षांपासून चेहऱ्यावर Tiger Mask लावून बाहेर पडते ही व्यक्ती, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:16 PM2019-04-22T16:16:28+5:302019-04-22T16:23:14+5:30

जग खरंच खूप निराळं आहे नेहमी समोर येत असलेल्या गोष्टींवरुन आपल्याला बघायला मिळतं. आता हीच व्यक्ती बघा ना....

This Tokyo man has been wearing a tiger mask for 47 years Shinjuku Tiger | गेल्या ४७ वर्षांपासून चेहऱ्यावर Tiger Mask लावून बाहेर पडते ही व्यक्ती, जाणून घ्या कारण...

गेल्या ४७ वर्षांपासून चेहऱ्यावर Tiger Mask लावून बाहेर पडते ही व्यक्ती, जाणून घ्या कारण...

Next

जग खरंच खूप निराळं आहे नेहमी समोर येत असलेल्या गोष्टींवरुन आपल्याला बघायला मिळतं. आता हाच व्यक्ती बघा ना....योशिरो हरदा नावाची ही व्यक्ती जपानमध्ये राहते. ही व्यक्ती पेपर विकण्याचं काम करते. पण त्यांना २४ व्या वर्षी एक आयडिया सुचली.  एका दुकानातून त्यांनी एक दोन नाही तर चक्क ३० टायगर मास्क खरेदी केले. आता ४७ वर्ष झालेत. योशिरो तेव्हापासून ते आतापर्यंत दररोज सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री हा मास्क लावतात. 

योशिरो यांचं वय आता ७१ वर्ष आहे. पण आजही ते मास्क लावतात. जग त्यांना 'शिंजुकु टायगर' म्हणूण हाक मारतं. वर्ष १९६७ मध्ये योशिरो याचं कुटुंब आता टोकियामध्ये आलं आहे. ते यूनिव्हर्सिटी ड्रॉपआउट आहेत. शाळेच्या दिवसांपासूनच ते खर्चासाठी पैसे निघावे म्हणूण पेपर वाटायचं काम करायचे. यूनिव्हर्सिटीच्या दिवसात त्यांनी शिक्षणाऐवजी काम करण्याचा मार्ग निवडला आणि ते नापास झाले. 

१९७२ मध्ये श्राइन फेस्टिव्हल बघण्यासाठी योशिरो गेले होते. शिंजुकुच्या आयोजित या फेस्टिव्हलदरम्यान त्यांनी नजर एका दुकानावर गेली जिथे टायगर मास्क ठेवले होते. हा मास्क फारच रंगीबेरंगी होता. त्यांनी ३० मास्क खरेदी केले. त्यांनी आतापर्यंत हे मास्क सांभाळून ठेवले आहेत.

मजेदार बाब म्हणजे योशिरो यांनी असं का केलं याची माहिती कुणालाच नाही. स्वत: ते सुद्धा याबाबत फार काही बोलत नाहीत. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, 'माहीत नाही, मी सुद्धा काही विचार करुन केलं नाही. हा एक अचानक आलेला विचार होता आणि काही नाही'. ते सांगतात की, जेव्हा ते रस्त्याने जातात तेव्हा लोक त्यांना पाहून आनंदी होतात, हसतात आणि हे त्यांच्या आनंदाचं कारण आहे. 

टोकियोच्या लोकांसाठी 'शिंजुकु टायगर' म्हणजेच योशिरो हरदा लिव्हिंग लिजंडसारखे आहेत. प्लास्टिक टायगर मास्कसोबत एका गुलाबी रंगाचा वीग लावतात. तसेच रंगीबेरंगी कपडेही परिधान करतात. तसेच शरीरावर वेगवेगळ्या खेळणी लटकवलेल्या असतात. याचं वजन १० किलो असतं. आता वय खूप झालं तरी योशिरो दररोज बाहेर पडतात. ते सांगतात हे माझ्या परिवारासारखं आहे. मला हे शरीरावरुन काढायचं नाहीये'.

वयाच्या या टप्प्यावर अनेकजण  नोकरीतून रिटायमेंट घेतात. पण योशिरो काम करतात. ते याला त्यांचं पॅशन मानतात. ते सांगतात की, 'मी आजही हे काम करताना अजिबात थकत नाही. मी मनाने जंगलाचा राजा आहे'. त्यांच्या जीवनावर माहितीपटही तयार करण्यात आला आहे. 

Web Title: This Tokyo man has been wearing a tiger mask for 47 years Shinjuku Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.