टोकियो ऑलिम्पिकमध्ये घेतली एका प्राण्याने एंट्री, हॉकीची मॅच सोडून त्या प्राण्याचीच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 07:21 PM2021-07-29T19:21:12+5:302021-07-29T19:23:43+5:30
सध्या सोशल मिडियावर टोकियो ऑलिम्पिक मधला एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात खेळाडू नाही ना प्रेक्षक. यात कोणताही माणूस नसून चक्क एक प्राणी दिसतोय. आता तुम्ही म्हणाल टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्राणी काय करतोय. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पहावाच लागेल...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रत्येक खेळाकडे सर्वांच लक्ष लागलंय. प्रत्येकजण वेळात वेळ काढुन हे खेळ पाहातायत. अशातच खेळाडूंच्या सामन्याचे आणि स्पर्धांशी संबधित इतरही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतायत. पण सध्या सोशल मिडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात खेळाडू नाही ना प्रेक्षक. यात कोणताही माणूस नसून चक्क एक प्राणी दिसतोय. आता तुम्ही म्हणाल टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्राणी काय करतोय. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पहावाच लागेल...
— man (@s6ntispam) July 26, 2021
स्पेन आणि अर्जेंटिनाच्या महिला संघाची हॉकी मॅच सुरु होती. कॅमेरा मॅचचा प्रत्येक क्षण कैद करत होता. तेवढ्यात कॅमेरामन ने एका झुरळावर कॅमेरा फिरवला. ते झुरळ तेव्हा तुरु तुरु पळत होतं. ही मॅच पाहणाऱ्यांनी हा क्षण पाहिला. पण इंटरनेटच्या जमान्यात काही लपून राहते का? ट्वीटरवर मॅन नावाच्या युजरनं तो व्हिडिओ पोस्ट केला आणि मग हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला.
सध्या सोशल मिडियावर या व्हिडिओचीच चर्चा सुरु आहे. आतापर्यंत याला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कित्येक लोक त्याला रिट्विट आणि शेअर करत आहेत. तर यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही केल्या जात आहेत. अनेकजण हे झुरळं मॅच बघायला आलंय का? अशा प्रतिक्रियाही देत आहेत.
त्यामुळे या सात सेकंदाच्या इवल्याश्या झुरळाने नेटकऱ्यांचं मन जिंकलय.