तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:15 PM2019-08-17T16:15:17+5:302019-08-17T16:15:50+5:30

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, टॅक्सी किंवा बसने... अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकलाच असाल ना? आणि मग काय बॉसच्या शिव्या ऐकल्याच असतील... अशातच तुमच्या डोक्यात कधी उडत ऑफिसला जाण्याचा विचार आलाय का?

Tom prideaux brune uses an engine powered paraglider to get to office | तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

Next

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, टॅक्सी किंवा बसने... अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकलाच असाल ना? आणि मग काय बॉसच्या शिव्या ऐकल्याच असतील... अशातच तुमच्या डोक्यात कधी उडत ऑफिसला जाण्याचा विचार आलाय का? आता तुम्ही म्हणाल काही काय सांगताय? खरचं उडत ऑफिसला जाता येतं. तुम्हाला खरं वाटत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका व्यक्तीला भेटवतो. ही व्यक्ती ऑफिसला चक्क उडत जाते. या व्यक्तीचं नाव आहे टॉम प्राइडो-ब्रून. टॉम एक पॅरामोटर ग्लायडर असून ते पॅराजेट इंटरनॅशनल कंपनीचे सेल्स अॅन्ड मार्केटिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये पॅरामोटर उपकणं तयार केली जातात. आणखी एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे, तिथे उडत ऑफिसला जाणारे हे एकटेच नाही तर 12 ते 14 व्यक्ती पॅरामोटरचा वापर करून ऑफिसला येतात. साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वी याची अधिकृतपणे सुरुवात झाली होती. 

पाठीवर बांधतात पॅरामोटर ग्लायडर 

ऑफिसमध्ये जाण्याआधी टॉम आपल्या पाठीवर एक मोठा जाळीदार घेर आणि त्यासोबत पॅरामोटर ग्लायडरचे बेल्ट बांधले जातात. त्यानंतर ते खांद्यावर असलेली दोरी ओढून मोटर सुरू करतात. ज्यानंतर पाठीवर बांधलेला पंखा सुरू होतो. त्यानंतर ते 10 ते 12 पावलं धावून आपले दोन्ही पाय हवेमध्ये उंचावून झेप घेतात आणि पॅरामोटर ग्लायडर काम करू लागतं. दररोज असेच ते ऑफिसला जातात. 

सर्वात आधी वातावरण पाहतात

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, टॉमचं ऑफिस दक्षिण पश्चिमी इग्लंडच्या विल्टशायरमध्ये आहे. वातावरण योग्य असेल तर ते दररोज पॅरामोटचा उपयोग करून ऑफिसला जातात. असं नाही की टॉम सगळीकडे उडतच जातात. अनेक ठिकाणी ते बाइकच्या मदतीने किंवा चालतही जातात. पण उडत जाणं त्यांना जास्त अॅडव्हेंचर्स वाटतं. 

50 किमीच्या स्पीडने उडतात

घरातून ऑफिसला जाण्यासाठी ते शेरबोर्नपासून डॉर्सेटपर्यंत 30 किलोमीटर दूरपर्यंत उडत जातात. काही पॅरामोटर ग्लायडर याहीपेक्षा वेगाने उडू शकतात. ज्यावेळी ते हिरव्यागार शेतांमधून जातात. त्यावेळी त्यांना ते दृश्य फार सुंदर दिसतं. ते म्हणतात की, दिवसाची सुरुवात करण्याआधी त्यांचं मन अगदी प्रसन्न होतं. 

पॅरामोटरिंगमध्येही आहे धोका...
 
जेव्हा टॉम ऑफिसजवळ पोहोचतात, त्यावेळी ते आपला वेग कमी करून हळूहळू खाली उतरतात. लॅन्डिंग करताना त्यांना 10 ते 15 मीटरपर्यंत धावावं लागतं. ते एका इंजिन असणाऱ्या पॅराग्लायडरचा वापर करतात. पॅरामोटरिंगचा रोमांचित करणारा अनुभव अनेकदा धोकादायकही ठरू शकतो. जास्तीत जास्त अपघात उडण्यासाठी झेप घेताना होतात. त्यामुळे अनेकदा पॅरामोटर पायलटना पाण्यावरून उडण्यासाठी मनाई केली जाते. 

Web Title: Tom prideaux brune uses an engine powered paraglider to get to office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.