बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:42 AM2023-12-08T09:42:07+5:302023-12-08T09:42:22+5:30
नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली.
बरेच लोक अॅडव्हेंचर म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करतात. कुणी अॅडव्हेंचर ट्रीपला जातात तर कुणी काहीतरी साहसी करतात. पण जवळपास सगळ्याच अॅडव्हेंचर अॅक्टिविटीमध्ये जीवाला धोका असतो. इतकंच काय तर अशा अॅडव्हेंचर अॅक्टिविटी चालवणाऱ्या कंपन्या लोकांकडून आधीच दुर्घटनेची जबाबदारी न घेण्यासंबंधी कागदांवर सही करून घेतात. अशात काही दुर्घटना झाली तर कुणी काही करू शकत नाही.
नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली. 3 डिसेंबरला 56 वर्षीय व्यक्तीने जगातील सगळ्यात उंच 764 फूट उंच बंजी जंपवरून उडी मारली. पण लगेच त्याचा श्वास बंद झाला. कथितपणे त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
द मिररच्या रिपोर्टनुसार, बंजी जंप संचालक एजे हॅकेटच्या स्कायपार्कने सांगितलं की, मृत्युची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले की, बंजी जंप करण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून आधी त्यांच्या आरोग्य समस्यांबाबत माहिती घेतली जाते. हाय ब्लड प्रेशर, सर्जरी, शुगर आणि हार्ट डिजीज असलेल्या लोकांना अॅक्टिविटी करू दिली जात नाही.
अशात चौकशी केली जात आहे की, व्यक्तीने त्याच्या आरोग्याबाबत खोटं तर सांगितलं नसेल ना. दरम्यान ही अशी काही पहिली घटना नाही. आधीही अॅडव्हेंचरच्या नादात अशा घटना घडल्या आहेत. याचवर्षी एक व्यक्ती घटस्फोट साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यासाठी गेली होती, तेव्हा एक मोठी दुर्घटना घडली.
दोर तुटल्यामुळे ही व्यक्ती 70 फूट उंचावरून खाली पडली होती. त्यामुळे त्याच्या मानेवर गंभीर इजा झाली होती. ही व्यक्ती ब्राझीलच राहणारी होती. 22 वर्षीय राफेल आपल्या घटस्फोटानंतर ब्यूटी स्पॉट नावाच्या स्थानावर गेली होती. तेव्हाच त्याच्यासोबत ही घटना घडली होती.