या गावातील प्रत्येक घरात आहे एक विमान, कारसारखाच अनेक गोष्टींसाठी करतात वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:20 AM2023-09-19T10:20:43+5:302023-09-19T10:37:47+5:30
जगात अशा काही कॉलनी किंवा गावं आहेत जेथील प्रत्येक घरांसमोर विमान पार्क केलेलं असतं.
तुम्ही अनेकदा पाहत असाल की, आजकाल सगळ्याच घरांसमोर कार किंवा बाईक पार्क केलेल्या दिसतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात अशा काही कॉलनी किंवा गावं आहेत जेथील प्रत्येक घरांसमोर विमान पार्क केलेलं असतं. हे चित्र अमेरिकेतील रेसिडेंशिअल एअरपार्कमध्ये बघायला मिळतं.
येथील लोक ये-जा करण्यासाठी विमानांचा वापर करतात. आता हे कसं झालं असा पश्न तुम्हाला पडला असेलच. चला जाणून घेऊ यामागचं कारण...दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेत 1939 मध्ये 34 हजार पायलट होते. पण 1946 पर्यंत ही संख्या 4 लाखांच्या घरात गेली होती.
जेव्हा युद्ध संपलं तेव्हा बरेच एअरफील्ड आणि पायलट रिकामे झाले. ही समस्या दूर करण्यासाठी अमेरिकेतील The Civil Aeronautics Administration ने निवासी एअरपार्क बनवण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत बंद झालेल्या मिलिट्री Airstips वर रिटायर्ड मिलिट्री पायलटांना वसवण्याचा निर्णय घेतला गेला.
अशा वस्त्यांना 'फ्लाय-इन कम्यूनिटीज' म्हटलं जातं. इथे प्रत्येक घरात कारसारखंच एक विमानही असतं. या वस्तीत रस्ते इतके रूंद असतात की, एक प्लेन आणि कार आजूबाजूने जाऊ शकतात.
जगभरात अशाप्रकारचे 630 निवासी Airparks आहेत. ज्यातील 610 पेक्षा जास्त अमेरिकेत आहेत.
कॅलिफोर्नियातील कॅमरून पार्क विमानतळ निवासी Airparks पैकी एक आहे. नुकताच thesoulfamily नावाच्या एका टिकटॉक यूजरने येथील एक व्हिडीओ तयार केला होता. ज्यात घरांसमोर कारऐवजी विमान पार्क आहेत.
कॅलिफोर्नियातील Fresno चा Sierra Sky Park पहिला एअरपार्क होता. हा पार्क 1946 मध्ये तयार करण्यात आला होता.