भारीच! 'या' कंपनीने गेम खेळण्याची नोकरी सुरू केली, आठवड्याला मिळणार ३.५ लाख रुपये पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 02:51 PM2023-08-07T14:51:58+5:302023-08-07T14:53:14+5:30

एका कंपनीने गेम खेळणाऱ्यांना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे.

toy company mattel is hiring a chief uno player to play game and earn over 3 lakhs a week | भारीच! 'या' कंपनीने गेम खेळण्याची नोकरी सुरू केली, आठवड्याला मिळणार ३.५ लाख रुपये पगार

भारीच! 'या' कंपनीने गेम खेळण्याची नोकरी सुरू केली, आठवड्याला मिळणार ३.५ लाख रुपये पगार

googlenewsNext

सध्या अनेक ठिकाणी बेरोजगारी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जगभरात यावरुन चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता एका कंपनीने नवीन ऑफर लाँच केली आहे, ही कंपनी गेम खेळणाऱ्यांना ३.५ लाख रुपये पगार देणार आहे. पण या कंपनीत काम करण्यासाठी तुमच्यामध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे. 

चमत्कार! मृत्यूनंतर अर्ध्या तासाने जिवंत झाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष; नेमकं काय घडलं?

तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही लाखो रुपये सहज कमवू शकता. अशाही अनेक नोकऱ्या आहेत, ज्यांना लोक विचित्र समजतात, पण प्रत्यक्षात त्या नोकऱ्यांमध्ये तुम्हाला इतके पैसे मिळतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशीच एक वेगळी नोकरी चर्चेत आहे, यामध्ये कंपनी दर आठवड्याला लाखोंमध्ये पगार देण्यास तयार आहे.

आपण सर्वजण गेम नेहमी खेळतो. जगातील अनेकजण गेम खेळण्यात जास्त वेळ वाया घालवतात. पण आता या वेळेत तुम्हला भरपूर पेसे मिळू शकतात. Mattle नावाची एक टॉय कंपनी आता तुम्हाला गेम खेळण्याचे पैसे देणार आहे.

एका अहवालानुसार, कंपनी मुख्य UNO खेळाडूच्या शोधात आहे. तुम्हाला UNO खेळायला आवडत असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला फक्त चार तास UNO Quattro गेम खेळायचा आहे आणि लोकांना या खेळाचे नियम सांगायचे आहेत. या कामाच्या बदल्यात कंपनी दर आठवड्याला ४४४४ डॉलर म्हणजेच ३.५ लाख रुपयांपेक्षा जास्त देण्यास तयार आहे. कंपनीचे कार्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे, म्हणजेच जर तुमची या नोकरीसाठी निवड झाली असेल, तर तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये असलेल्या कार्यालयात काम करावे लागेल.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट आहे. कंपनीला मुख्य UNO खेळाडूच्या नोकरीसाठी काही पात्रता देखील आवश्यक आहेत, त्यापैकी पहिली म्हणजे खेळाडूची वागणूक चांगली असावी, UNO कसे खेळायचे हे माहित असले पाहिजे, लोकांना गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि खेळाचे नियम माहित असले पाहिजेत. हे देखील सांगावे लागेल. 

Web Title: toy company mattel is hiring a chief uno player to play game and earn over 3 lakhs a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.