ट्रेनमध्ये काहीही घडू शकतं..!! प्रवाशांनी टीसी ला शौचालयात केलं बंद, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 02:42 PM2023-08-13T14:42:39+5:302023-08-13T14:43:12+5:30

ट्रेनच्या बोगीमध्ये सारे बसले असतानाच टीसी आला अन् मग...

train passengers get angry directly locked tc in toilet after power cut in railway bogie | ट्रेनमध्ये काहीही घडू शकतं..!! प्रवाशांनी टीसी ला शौचालयात केलं बंद, पण का?

ट्रेनमध्ये काहीही घडू शकतं..!! प्रवाशांनी टीसी ला शौचालयात केलं बंद, पण का?

googlenewsNext

Train TC locked in toilet: ट्रेनने प्रवास करत असताना नकळतच बराच वेळा आपला हात तिकीट नीट ठेवलंय ना, हे बघण्यासाठी खिशाकडे जातो. त्यातही टीसी आला की आपण थोडेसे तयारीतच असतो. टीसी तिकीट तपासून गेला की मग आपण अगदी निश्चिंतपणे आपला प्रवास करतो. पण नुकतेच एका ट्रेनमध्ये टीसीला वेगळाच अनुभव आला. वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच जागी उभी होती. यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी थेट टीसीलाच धारेवर धरले. इतकेच नव्हे तर त्याला शौचालयात नेले व पुढे वेगळेच काही तरी घडले.

नक्की काय झालं?

शुक्रवारी आनंद विहार ते गाझीपूर या सुहेलदेव ट्रेनमध्ये चढलेल्या प्रवाशांसोबत एक वेगळा अनुभव घडला. दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नियमित वेळेनुसार आनंद विहारहून निघाली. मात्र गाडी पुढे सरकली असता ट्रेनच्या दोन बोगींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एसीही बंद पडला आणि गर्मीमुळे लोकांची चीडचीड झाली. वाढत्या उन्हामुळे बोगीतून प्रवास करणाऱ्या लहान मुले व महिलांच्या अडचणी वाढल्या. ट्रेनमध्ये टीसी ला पाहिल्यावर B1 आणि B2 डब्यातील लोकांनी त्याच्यावर राग काढला आणि टीसीला थेट शौचालयात बंद करून टाकले.

प्रकरण वाढल्याने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा ही परिस्थिती वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत तात्काळ दोन रेल्वे डब्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ट्रेन तुंडला रेल्वे स्थानकावर आली तेव्हा इंजिनीअर्सच्या पथकाने ट्रेनच्या डब्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली. काही वेळाने बी १ कोचमधील वीज खंडित होण्याची समस्या दूर झाली. यानंतर, बी2 कोचमध्येही वीज पूर्ववत झाली आणि ट्रेन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली.

Web Title: train passengers get angry directly locked tc in toilet after power cut in railway bogie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.