रेल्वेचा स्पीड दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त का असतो? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:46 AM2022-12-21T11:46:10+5:302022-12-21T11:46:27+5:30
Trains Speed At Night : कधी नोटीस केलं असेल की, रेल्वे दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक वेगाने धावते. मात्र, याचं कारण तुम्हाला माहीत नसेल.
Trains Speed At Night : भारतीय रेल्वे देशाची लाइफलाईन आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. आपण सगळ्यांनीच कधीना कधी रेल्वेने प्रवास असेलच. खिडकीजवळ बसून बाहेरचा सुंदर नजारा पाहिला असेल. रेल्वेच्या प्रवासाची आपली एक वेगळीच मजा असते. पण कधी नोटीस केलं असेल की, रेल्वे दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक वेगाने धावते. मात्र, याचं कारण तुम्हाला माहीत नसेल.
काय आहे मुख्य कारण?
दिवसादरम्यान तुम्ही लोकांना रेल्वे रूळ ओलांडून इकडे-तिकडे जाताना पाहिलं असेलच. तसा तर हा कायद्याने गुन्हा आहे. पण अनेक लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत. इतकंच नाही तर दिवसादरम्यान प्राणीही रेल्वे रूळ क्रॉस किंवा रेल्वे रूळावर थांबतात.
रात्रीच्या वेळी मनुष्य आणि प्राणी दोघांचीही ये-जा कमी होते. ज्याचा लाभ रेल्वे चालकाला मिळतो. त्यांना दिवसांच्या तुलनेत रात्री हाय स्पीड रेल्वे चालवल्याने होणाऱ्या दुर्घटनांची चिंता कमी राहते. यामुळे रात्री रेल्वेचा स्पीड जास्त राहतो.
रात्री नसतं मेंटेनन्सचं काम
तुम्ही दिवसावेळी रेल्वेने प्रवास करताना नोटीस केलं असेल की, रेल्वे रूळांवर कधी कधी मेंटेनन्सचं काम सुरू असतं. ज्यामुळे रेल्वे थांबवली जाते. याची शक्यता रात्री कमी असते. रात्रीच्या वेळी मेंटेनन्सचं काम शक्यतो केलं जात नाही. त्यामुळे काही अपघात होण्याची चिंता न करता रेल्वेचा स्पीड वाढवणं सोपं होतं.
रात्री सिग्नल जास्त स्पष्ट दिसतात
तुम्ही कधीना कधी नोटीस केलं असेल की, एखादं स्टेशन आलं की, रेल्वेचा स्पीड स्लो केला जातो आणि सिग्नलची वाट पाहिली जाते. जेणेकरून त्यांना समजावं की, रेल्वे रूळ रिकामा आहे. हे सिग्नल रात्री जास्त स्पष्ट दिसतात. रेल्वे चालकाला ‘लोटो पायलट‘ म्हटलं जातं. सिग्नल त्यांना दुरूनच दिसतात. त्यामुळे स्टेशन येण्याआधी त्यांना स्पीड कमी करावा लागत नाही.