झाडांना 'जादू की झप्पी', महिलेचा चिंतामुक्त होण्याचा अजब फंडा; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 09:28 AM2023-06-29T09:28:38+5:302023-06-29T09:31:20+5:30
Tree Hugging : चीनमध्ये एक महिला एका खास कारणाने चर्चेत आहे. ती सुद्धा मुन्नाभाई सारखी गळाभेट देते, पण मनुष्यांना नाही तर झाडांना.
Tree Hugging : 'जादू की झप्पी' हा ‘मुन्ना भाई एसबीबीएस’ सिनेमातील शब्द तर तुम्ही ऐकला असेलच. या सिनेमात अभिनेता संजय दत्त सगळ्यांना जादू की झप्पी देऊन त्यांना चिंतामुक्त करतो. म्हणजे कुणाची प्रेमाने गळाभेट घेतली तर समोरच्या व्यक्तीला चांगलं वाटतं. त्याचा त्रास कमी होतो. मुळात हे सत्यच आहे की, गळाभेट घेतल्याने सकारात्मक आणि ऊर्जावान वाटतं. पण चीनमध्ये एक महिला एका खास कारणाने चर्चेत आहे. ती सुद्धा मुन्नाभाई सारखी गळाभेट देते, पण मनुष्यांना नाही तर झाडांना.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही महिला चीनच्या शांघायमध्ये राहते आणि तिचं नाव Qishishiqi आहे. या महिलेने गेल्या एप्रिलमध्ये एका झाडाला मीठी मारली होती. तेव्हा ती पतीसोबत बाहेर जात होती. महिलेला थोडं अस्वस्थ वाटतं होतं. अशात शांघायच्या एका रस्त्यावरील एका झाडाला तिने मीठी मारली तेव्हा तिला लगेच सकारात्मक वाटू लागलं.
महिलेने सांगितलं की, कामासंबंधी तणावामुळे ती फार चिंतेत होती. तिच्या कानात घंटी वाजल्यासारखा आवाज येत होता. पण जेव्हा तिने एका मोठ्या झाडाच्या खोडाला मीठी मारली तर तिला खूप शांत वाटलं. यानंतर ती इतर झाडांना मीठी मारण्यासाठी झाडांचा शोध घेऊ लागली. त्यासोबतच तिने तिची कहाणी लोकांनाही सांगितली.
सोशल मीडियावर व्हायरल एका पोस्टमध्ये किशिशिकी म्हणाली की, शांघायजवळील एका पार्कमधील एक हजार वर्ष जुन्या झाडाला मीठी मारल्यानंतर तिला चांगलं वाटलं होतं आणि ती बरी झाली होती. तिला असं जाणवलं जणू झाडही तिला मीठी मारत आहे. याप्रकारच्या झाडाने तिला चिंतामुक्त केलं.
महिला म्हणाली की, जेव्हा ती मनुष्यांना मीठी मारते तेव्हा तिला असं जाणवत नाही जसं झाडाला मीठी मारून वाटलं. आता ती नेहमीच झाडांना मीठी मारते. क़िशिशिकीने स्पष्ट केलं की, वास्तविक चिकित्सेऐवजी ट्री-हगिंग करण्याचा ती सल्ला देत नाही, पण चीनी पारंपारिक चिकिस्तेच्या समर्थकांचा दावा आहे की, झाडांना मीठी मारणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे.