या झाडाला लागतात ४० वेगवेगळ्या प्रकारची फुलं, या तंत्रज्ञानामुळे शक्य झाला हा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 09:29 PM2022-07-24T21:29:27+5:302022-07-24T21:30:02+5:30

असे एक झाड आहे, ज्याला 40 वेगवेगळ्या प्रकारची फळे लागतात. ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एका झाडाला 40 प्रकारची फळे लागण्याची संकल्पना शक्य झाली आहे. हे प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन यांच्यामुळे शक्य झाले.

tree with 40 fruits | या झाडाला लागतात ४० वेगवेगळ्या प्रकारची फुलं, या तंत्रज्ञानामुळे शक्य झाला हा चमत्कार

या झाडाला लागतात ४० वेगवेगळ्या प्रकारची फुलं, या तंत्रज्ञानामुळे शक्य झाला हा चमत्कार

googlenewsNext

झाडाला फळे लागलेली तुम्ही अनेकदा पाहिली असतील. ठराविक झाडांना ठराविकच फळे लागतात. मात्र तुम्ही कधी एकाच झाडाला 40 वेगवेगळी फळे लागलेली ऐकले आहे का ? नाही ना, मात्र हे खरे आहे. असे एक झाड आहे, ज्याला 40 वेगवेगळ्या प्रकारची फळे लागतात. ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एका झाडाला 40 प्रकारची फळे लागण्याची संकल्पना शक्य झाली आहे. हे प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन यांच्यामुळे शक्य झाले.

या अद्भूत झाडाला ‘ट्री ऑफ 40’ असे नाव देण्यात आले आहे. याला खजूर, चेरी, नेक्टराइन, जर्दाळू सारखी फळे लागतात. सॅम वॉन ऐकेन न्यूयॉर्कच्या सेराक्यूज युनिवर्सिटीमध्ये व्हिज्यूअल आर्टचे प्रोफेसर आहेत. ते एका शेतकरी कुटूंबातून येतात. प्रोफेसर वॉन 2008 पासून ट्री ऑफ 40 वर काम करत आहेत.

न्यूयॉर्कच्या स्टेट एग्रीकल्चरल एक्सपेरिमेंट दरम्यान वॉन यांचे लक्ष बागेकडे गेले. तेथे अनेक प्रकारची फळांची झाडे होती. मात्र बागेच्या देखभालेसाठी फंड मिळत नव्हता. झाडांची काळजी घेणारा व्यक्ती देखील नोकरी सोडून गेला होता. तेव्हा वॉन यांनी ती बाग भाड्यावर घेतली व आपले कार्य करण्यास सुरूवात केली.

बागेत अनेक झाडे जुन्या प्रजातीची होती. प्रोफेसर वॉन सांगतात की, त्यांनी ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाबद्दल ऐकले होते. लहान स्तरावर अनेकांनी असे काम केले होते. त्यांनी यावर रिसर्च करण्यास सुरूवात केली. अनेक कृषि वैज्ञानिकांशी आणि ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्यांची भेट घेतली.

ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या फळांच्या झाडांच्या फांद्या मुख्य झाडाला जोडल्या जातात. झाडाला फूल येण्यास सुरूवात झाली की, ही प्रक्रिया वापरतात. त्यानंतर फांद्यावर अनेक प्रकारचे रासायनिक लेप लावले जातात. 8 वर्षांच्या मेहनतीनंतर वॉन यांना अखेर यश मिळाले आहे. अखेर त्यांनी असे झाड तयार केले आहे की, ज्याला 40 फळे लागतात.

हे झाड दिसायला देखील सुंदर आहे. हे झाड बघायला लांबून लोक येतात. 2014 पासून वॉन यांनी आतापर्यंत अशी 14 झाडे तयार केली आहे. ट्री ऑफ 40 ची किंमत जवळपास 20 लाख आहे.

Web Title: tree with 40 fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.