बाहेरच्या शोरमावर मारला ताव, घरी येताच तब्येत बिघडली अन् हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 01:29 PM2023-10-27T13:29:01+5:302023-10-27T13:29:29+5:30
Food Poisoning After Eating Shawarma: घरचा सकस आहार खा आणि तंदुरूस्त राहा, असं जाणकार नेहमी सांगताना दिसतात. असे म्हटले ...
Food Poisoning After Eating Shawarma: घरचा सकस आहार खा आणि तंदुरूस्त राहा, असं जाणकार नेहमी सांगताना दिसतात. असे म्हटले जाते की बाहेरचे अन्न खाऊ नये, कारण यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. केरळमध्ये या प्रसंगातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील कोची येथे एका २४ वर्षीय व्यक्तीने बुधवारी शहरातील एका हॉटेलमधील प्रसिद्ध असलेली डिश म्हणजेच शोरमा (Shwarma) खाल्ला. त्यानंतर त्याला त्रास झाला. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आल्याने त्याला काही दिवसांनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जे झाले, ते वाचून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
नक्की काय घडलं?
अन्नातून विषबाधा झाल्याच्या लक्षणांमुळे राहुल डी नायर या तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची तब्येत काही बरीच बिघडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी कोची येथील सेझमधील कर्मचारी असलेल्या राहुलने ले हयात या रेस्टॉरंटमध्ये शोरमा खाल्ला. बाहेरचे अन्न खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलच्या पोटात अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागली, त्यामुळे अनेक अवयवांनी काम करणे बंद केले. त्यानंतर त्याची तब्येत अधिक बिघडली. शनिवारपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. पण अखेर दुर्दैवाने अन्नातून विषबाधा झाल्याने मुलाचा मृत्यू झाला आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, “शोरमामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. शोरमामुळे अन्नातून विषबाधा झाली की नाही हे शोधण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. ज्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, त्या लोकांनी याची पुष्टी केली आहे की हे अन्न विषबाधाचेच प्रकरण होते."