Trending Video: समुद्र किनारी दिसले भयानक दृश्य, व्हिडिओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:04 IST2022-09-12T16:02:04+5:302022-09-12T16:04:46+5:30
Trending Alligators Video: सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात, अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Trending Video: समुद्र किनारी दिसले भयानक दृश्य, व्हिडिओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
Shocking Video:सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा विविध प्राण्यांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा अशाप्रकारचे व्हिडिओ पाहून अंगावर शहारे उभे राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक-दोन नव्हे, तर शेकडो मगरी आलेल्या दिसत आहेत.
थरकाप उडवणारे दृष्य
मगरीला पाण्यातील सर्वात मोठा शिकारी म्हणतात. मगर असलेल्या पाण्यात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. अनेकदा गाव किंवा शहरामध्ये पूराच्या पाण्यासोबत मगर आल्याच्या घटना घडतात. अशावेळी त्या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण असते. तर विचार करा की, अशाप्रकारे शेकडो मगरी दिसल्यावर तुमचे काय होईल.
व्हिडिओ पाहून लोक घाबरले...
विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, चुकून एखादा प्राणी या ठिकाणी आला तर त्या मगरी त्याची काय अवस्था करतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. बरेच लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.