मंदिराखाली आढळून आला 4800 फूट लांब भुयार, एका प्रसिद्ध राणीची कबर मिळण्याचा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:56 AM2022-11-10T09:56:51+5:302022-11-10T09:59:49+5:30
Mystery Inside Temple: मंदिराखाली सापडलेला भुयार दगडाला कापून तयार करण्यात आला आहे. राणी क्लियोपेट्राच्या कबरेबाबत अनेक रहस्यमय किस्से सांगितले जातात.
Mystery Inside Temple: एका प्राचीन मंदिराखाली एका भुयार आढळून आला आहे. हा भुयार इजिप्तच्या तपोसिरिस मॅग्ना मंदिरात आढळून आला. खास बाब म्हणजे हा भुयार 4,800 फूटांपेक्षा जास्त लांब आहे. तर याची उंची साधारण 6 फूट आहे. असं सांगितलं जात आहे की, या भुयाराशी राणी क्लियोपेट्रा (Queen Cleopatra)चा खोलवर संबंध आहे.
मंदिराचं रहस्य
मंदिराखाली सापडलेला भुयार दगडाला कापून तयार करण्यात आला आहे. राणी क्लियोपेट्राच्या कबरेबाबत अनेक रहस्यमय किस्से सांगितले जातात. प्रसिद्ध आर्कियोलॉजिस्टने सांगितलं की, शेवटची शासक क्वीन क्लियोपेट्रा आणि तिचा प्रियकर मार्क एंटनीला एका मंदिराच्या आतच दफन करण्यात आलं होतं.
खोदकामादरम्यान सापडला भुयार
अनेक लोकांना मत आहे की, या भुयाराद्वारेच क्वीन क्लियोपेट्राच्या कबरेपर्यंत पोहोचता येऊ शकतं. या भुयारात कबर मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर त्यांची कबर इथे सापडली तर हा 21व्या शतकातील सगळ्यात मोठा शोध असेल. आर्कियोलॉजिस्ट कॅथलीन मार्टिनेज यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच एखाद्या मंदिराखाली भुयार किंवा अंडरग्राउंड रस्ता सापडला आहे. मंदिराच्या 43 फूट खाली असलेल्या या भुयारात कबर शोधली जात आहे.
आता या घटनेची चर्चा सोशल मीडियावर तूफान रंगली आहे. मंदिराच्या आता आणखीही काही नवीन गोष्टी आढळून आल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या भुयारात राणी क्लियोपेट्रा आणि अलेक्झांडर द ग्रेटच्या नावाची नाणी, शिर कापलेल्या मूर्ती सुद्धा सापडल्या आहेत.