'या' व्यक्तीला आहे जगात सर्वात लांब नाक, अजूनही रोज वाढत आहे साइज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:22 PM2021-10-08T16:22:53+5:302021-10-08T16:23:42+5:30
Longest Nose : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मेहमत ओजीयुरेकच्या रेकॉर्डची घोषणा करताना सांगितलं होतं की, त्यांचं नाक जगातल्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात लांब आहे.
तुम्हाला माहीत आहे का जगात सर्वात लांब नाकाचा (Longest Nose) रेकॉर्ड कुणाच्या नावावर आहे? तुर्कीमध्ये राहणाऱ्या मेहमत ओजीयुरेकचं (Mehmet Özyürek) नाक जगात सर्वात लांब आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नावही नोंदवलं आहे. खास बाब ही आहे की, त्यांचं नाक दिवसेंदिवसे वाढत आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात त्यांचं नाक ३.५ इंचापेक्षाही लांब होऊ शकतं.
११ वर्षापासून कायम आहे रेकॉर्ड
‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, तुर्की येथे राहणारा ७१ वर्षीयय मेहमत ओजीयुरेक जगातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे ज्याचं नाक ३.५ इंच (८.८सेमी) लांब आहे. साधारण ११ वर्षाआधी आपल्या नाकासाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं होतं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही तोडू शकलेलं नाही. ते म्हणाले की, त्यांच्या नाकाची लांबी अजूनही वाढत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मेहमत ओजीयुरेकच्या रेकॉर्डची घोषणा करताना सांगितलं होतं की, त्यांचं नाक जगातल्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात लांब आहे. असं असलं तरी इतिहासात सर्वात लांब नाकाचा रेकॉर्ड इंग्लिशमॅन थॉमस वेडर्सच्या नावावर आहे. १८व्या शतकातील इंग्लिशमॅनचं नाक आश्चर्यकारकपणे ७.५ इंच लांब होतं. पण ते आता जिवंत नसल्याने हा रेकॉर्ड मेहमत यांच्या नावे आहे.
खिल्ली उडवत होते लोक
मेहमत ओजीयुरेक यांना त्यांच्या नाकामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोक त्यांची खिल्लीही उडवतात. ते म्हणतात की, 'नाक चेहऱ्याची शोभा वाढवतं. जर नाक योग्य आकारात नसेल तर चेहरा अजब दिसायला लागतो. माझं लांब नाक बघून लोक माझी खिल्ली उडवत होते. माझ्यावर हसत होते. आधी खूप वाईट वाटायचं. पण मग सवय झाली. आता त्याचा नाकामुळे माझ्या नावावर रेकॉर्ड आहे'.