अति घाई संकटात नेई! पहिल्याच डेटला KISS करताना मॉडलची कापली गेेली जीभ; करावी लागली सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:31 PM2023-01-13T13:31:39+5:302023-01-13T14:16:16+5:30
Accident While Kissing : 34 वर्षीय टर्किश मॉडल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने सांगितलं की, ती पहिल्या डेटवर गेली होती.
Accident While Kissing : आयुष्यात आपलं पहिलं प्रेम आणि पहिलं किस कधीही कुणी विसरू शकत नाही. हा अनुभव नेहमीच मनाच्या कोपऱ्यात राहतो. किसला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. पण तुर्कीच्या एका मॉडलला किस करणं फारच महागात पडलं. जोश जोशमध्ये तिच्या पार्टनरने असं जोरदार KISS केलं की, तिची जीभ कापली गेली. इतकंच काय तर तिला इमरजन्सी सर्जरी करावी लागली. मॉडलने तिचा हा अनुभव इन्स्टावर पेजवर शेअर केला.
जोशात भान विसरला पार्टनर
34 वर्षीय टर्किश मॉडल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने सांगितलं की, ती पहिल्या डेटवर गेली होती. फ्रेंच किस दरम्यान दोघेही देहभान विसरलो. यादरम्यान तिचा पार्टनर जास्तच जोशात आला आणि इतकं जोरात किस केलं की, माझी जीभ कापली गेली. तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. मला इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि एक सर्जरी करावी लागली. सेडा म्हणाली की, असंही होऊ शकतं की, मी पहिली व्यक्ती आहे जिची किस करताना जीभ कापली गेली. ही गंमत नाहीये. खूप वेदना होत आहे.
माहीत नव्हतं फ्रेंच किस कसं करायचं
द सनच्या रिपोर्टनुसार, डा एर्सोईने आपल्या फॅन्सचे धन्यवाद मानले. म्हणाली की, मी आता ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. ऑपरेशन कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झालं. डॉक्टरांनी जीभ सील केली. काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. सेडाने तिच्या डेटबाबत सांगितलं की, कदाचित त्याला माहीत नव्हतं की, फ्रेंच किस कसं करावं लागतं. त्यामुळे इतकी गडबड झाली. मला वाटतं मी अजून त्या ठीकपणे जाणून घेऊ शकले नाही. कारण आम्हाला भेटून एक महिनाच झालाय.
सेडा एर्सोई तुर्कीची एक मॉडल आहे आणि तुर्की 2010 ची मिस फोटोमॉडल कॉम्पिटिशनची विनरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 620,000 फॉलोअर्स आहेत. सेडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, तू काय एलिअन किंवा ड्रॅगनला किस केलं?