निकालानंतरच्या वळणावर...
By Admin | Published: June 9, 2015 01:58 AM2015-06-09T01:58:14+5:302015-06-09T01:58:14+5:30
दहावीची परीक्षा ही काही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. कित्येक प्रथितयश व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात शालेय परीक्षा पास होणे कठीण गेले होते.
दीपाली दिवेकर (समुपदेशक)
दहावीची परीक्षा ही काही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. कित्येक प्रथितयश व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात शालेय परीक्षा पास होणे कठीण गेले होते. उदाहरणार्थ आइनस्टाइन. भाषा विषयात गती नाही म्हणून आइनस्टाइन यांना शाळेतून काढून टाकल्याचे वाचले होते. यासाठीच नापास झालात म्हणून खचून जाऊ नका. अवतीभोवती नजर टाका. उदरनिर्वाहासाठी लोक कोणकोणती कामे करतात त्याचा आढावा घ्या. त्यापैकी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत याचा विचार करा. उदरनिर्वाहासाठी आपण कोणत्या नैतिक मार्गाचा विचार करू शकतो याचा विचार करा. त्या मार्गावर जाण्यासाठी कोणती कौशल्ये अथवा पात्रता संपादित करावी याचा विचार करा.
-----------
कालच एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. काहींना अपेक्षेपेक्षा जास्त, काहींना अपेक्षेपेक्षा कमी असे गुण मिळाले असतील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि नापास विद्यार्थ्यांसाठी इी३३ी१ ’४ू‘ ल्ली७३ ३्रेी. मात्र एक लक्षात ठेवा, की पुढच्या वेळी शंभर टक्के प्रयत्न करा.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या निकालाचे विषयवार पृथ:करण करा. एकूण टक्केवारी खूप चांगली आहे. त्यावरून शाखेची निवड करायला गेलात, तर दिशाभूल होण्याची शक्यता आहे. कोणत्या विषयात किती मार्क्स आहेत, हे पाहा. त्याचबरोबर कोणता विषय आपल्याला अभ्यासायला आवडतो याचा विचार करा. जास्त मार्क्स ज्या विषयात मिळतात तो विषय आपल्या आवडीचा असतोच असे नाही. केवळ जास्त मार्क्स आहेत म्हणून एखाद्या नावडत्या विषयात प्रवेश घेतलात तर कंटाळून जाण्याची शक्यता असते. तुमच्या यंत्र जनरेशनच्या भाषेत सांगायचे तर ‘बोअर’ होऊन जाल.
कमी मार्क्स मिळालेत ठीक आहे, यापुढे वाढतील. आवडीच्या शाखेत प्रवेश घ्या आणि दरवर्षी किमान २ टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवा. पदवीपर्यंत कमीत कमी १० टक्के तरी वाढतीलच ना?
थोडक्यात काय, यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. स्वत:ला ओळखा आणि पुढे चला. ळँ्रल्ल‘ स्र१ंू३्रूं’’८
आणखी एक... जनरल नॉलेज वाढवण्याची गरज फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनाच असते असे नाही. आजच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात स्मार्ट युवक म्हणून स्मार्ट करिअर करायेच असेल तर ज्ञान, कौशल्य संपादित करीत जा आणि स्वत:ला सिद्ध करा, तेही स्मार्टली.
भाषा आणि समाजशास्त्र
या विषयांची आवड असेल व गतीही असेल तर ११वी, १२वी कला शाखेतून करण्याचा जरूर विचार करा. दोन भाषा आणि इतिहार, भूगोल, अर्थशास्त्र, राजशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, गणित, संख्याशास्त्र यापैकी कोणतेही चार विषय या दोन वर्षांमध्ये अभ्यासावे लागतील. यातील कोणत्याही विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेटपर्यंत शिकता येईल. प्रत्येक विषयातून मिळणाऱ्या करिअर संधी वेगवेगळ्या आहेत. याखेरीज पत्रकारिता, डिझायनिंग, गं्रथालय शाळा, कायदेशास्त्र, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल- टूरिझम, स्पर्धा परीक्षा, समाजसेवा, फाइन आर्ट्स इत्यादी पर्यायांचा विचार करता येईल.
गणित
या विषयाची आवड असेल तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही शाखांमधून हा विषय शिकता येतो. गणितासह १२वी झाल्यानंतर आर्किटेक्चर, बी.एस्सी आय.टी., बी. सी एस. (कॉम्प्युटर अॅप्लिकेशन), बी. स्टॅटॅस्टिक्स, बी. मॅथेमॅटिक्स हे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना विज्ञान आवडते व जमत नाही आणि गणित आवडते आणि जमतेही त्यांनी विज्ञानाबरोबर स्वत:ची फरफट करण्याऐवजी आर्ट्स किंवा कॉमर्समधून गणित शिक ण्याचा विचार करावा.
विज्ञानाची
आवड व गती असेल तर त्यातही बारकाईने विचार करून विज्ञानात नेमके काय आवडते याचा विचार करा. जीवशास्त्र अधिक आवडत असेल तर भौतिक, रसायन व जीवशास्त्र घेऊन एकतर मेडिकल अभ्यासक्रम किंवा संशोधन अभ्यासक्रमांचा विचार करायला हरकत नाही. गणित आवडत नसेल तर त्याऐवजी मानसशास्त्र, भूगोल हे पर्याय निवडता येतात. मात्र गणित सोडल्यास अभियांत्रिकीची वाट बंद होते.
वाणिज्य
म्हणजे व्यापाराशी निगडीत शाखा. गणितासह किंवा गणितााशिवाय या क्षेत्रात करिअर करता येते. अकाउंट्स, बँकिंग, विमाशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, बुककीपिंग, व्यापार, संघटन यापैकी विषय अभ्यासता येतात. व्यापार, बँका, विमा, उद्योग, विमा, कर, सहकार, नियोजन इ. क्षेत्रात करिअर करता येते. कॉमर्समधील विषयांत ज्यांना थिअरी फारशी जमत नाही, मात्र प्रॅक्टिकली उत्तम करू शकतात अशांसाठी ऌरउ- श्ङ्मूं३्रङ्मल्लं’ किंवा कळक चे कोर्सेस हे उपजीविकेसाठी साधन निर्माण करून देणारे बऱ्यापैकी खात्रीशीर मार्ग आहेत.
इंजिनीअरिंग करण्याचे ध्येय असलेली मुले जीवशास्त्र व एक भाषा सोडून द्विलक्ष्यी अभ्यासक्रमातील एका टेक्निकल विषयाची निवड करू शकतात. त्यामुळे १२वीचा स्कोअर वाढायला मदत होते; मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमाचा रस्ता बंद होतो. त्यामुळे ज्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन असे सर्व रस्ते खुले ठेवायचे असतील त्यांनी ढउटइ(पीसीएमबी)सह जावे हे उत्तम. इंजिनीअर व्हायचंय पण गणित, विज्ञानाचा पाया तेवढासा पक्का नाही किंवा थिअरी जमत नाही, असे असेल तर दोन वर्षांचा वरीलपैकी टेक्निकल कोर्स करून 2ल्ल ि८ीं१ ्िरस्र’ङ्में साठी अॅडमिशन घेता येते व त्यातही चांगला स्कोअर केला, तर 2ल्ल ि८ीं१ ीिॅ१ीी ला अॅडमिशन घेऊन शेवटी इ.ए / इ.ळीूँ होता येते.