इथे आपोआप धावतात बंद वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:49 AM2017-03-24T00:49:54+5:302017-03-24T00:49:54+5:30

बंद पडलेली गाडी आपोआप धावताना तुम्ही कधी पाहिली आहे काय, नसेल तर तुम्ही कॅनडातील मॉन्कटन या शहराला भेट दिली पाहिजे.

Turn off the vehicles here automatically | इथे आपोआप धावतात बंद वाहने

इथे आपोआप धावतात बंद वाहने

Next

ओट्टावा : बंद पडलेली गाडी आपोआप धावताना तुम्ही कधी पाहिली आहे काय, नसेल तर तुम्ही कॅनडातील मॉन्कटन या शहराला भेट दिली पाहिजे. सभोवतीच्या पर्वतराजीमुळे या शहराचे जगभर नाव झाले आहे. या पर्वतराजीतील काही टेकड्यांना मॅग्नेटिक हिल (चुंबकीय टेकड्या) म्हटले जाते.
या ठिकाणी बंद गाड्याही आपोआप पळू लागतात. केवळ उतारावरच नाहीतर चढावरही त्या सहजपणे धावतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. टेकड्यांमधील चुंबकीय गुणधर्मामुळे हे घडते. या टेकड्यांच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम केवळ रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवरच होत नाहीतर आकाशात उंचावर उडणाऱ्या विमानांवरही होतो. त्यामुळे या पर्वतराजीजवळ येताच वैमानिकही विमानाची गती वाढवितात; अन्यथा येथील पर्वत विमानाला खाली ओढत आहेत, असे वाटते. अनेक वैमानिकांनी याचा अनुभव घेतला आहे. या अनोख्या पर्वतराजीचा १९३० मध्ये शोध लागला होता. चुंबकीय टेकड्यांमुळे हा परिसर आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, दूरवरून निसर्गाची कमाल पाहण्यासाठी येतात. येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते. अनेक जण आपली वाहने बंद करून चुंबकीय शक्तीचा अनुभव घेताना दिसतात.

Web Title: Turn off the vehicles here automatically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.