ताज्या हवेसाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops'मध्ये रूपांतरित!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 06:53 AM2019-07-21T06:53:49+5:302019-07-21T06:54:04+5:30

बस स्टॉप्सचा हा नजारा फार सुंदर आणि आकर्षक वाटत आहे. बस स्टॉपचे छत सुंदर करण्यासाठी त्यावर सेडमची झाडे लावण्यात आली आहेत

Turned bus stops to 'B-Stops' for fresh air! | ताज्या हवेसाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops'मध्ये रूपांतरित!

ताज्या हवेसाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops'मध्ये रूपांतरित!

Next

प्रदूषण दूर करून लोकांना शुद्ध आणि प्रदूषणमुक्त हवा मिळावी म्हणून इथे चांगले उपाय केले जात आहेत. नेदरलँडच्या यूट्रेक्सट शहरात एक अजब कारमाना करण्यात आला आहे. शहरातील ३१६ बस स्पॉप्सना B-Stops मध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. बस स्टॉप्सचा हा नजारा फार सुंदर आणि आकर्षक वाटत आहे. बस स्टॉपचे छत सुंदर करण्यासाठी त्यावर सेडमची झाडे लावण्यात आली आहेत. प्रशासनकडून हा निर्णय हवा शुद्ध आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी घेतला आहे.

त्यासोबतच यामाध्यमातून पावसाचं पाणी देखील साठवलं जाईल. ज्याने उन्हात दिलासा मिळेल. तसेच यातून मधमाशांच्या नंदनवनाच्या रूपातही पाहिलं जात आहे. याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये नेदरलँडची हवा शुद्ध करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले गेले. पुढेही अशाप्रकारच्या गोष्टी करत राहू. बस स्टॉपच्या छतांमधून बायोडायवर्सिटीसाठीही मदत मिळेल. त्यासोबतच येणाऱ्या काही काळात सर्वच बस स्टॉपवर सिंगल सोलर पॅनलही लावले जातील.

रिपोर्टनुसार, २०२८ पर्यंत शहरातील नागरिकांना पूर्णपणे कार्बनमुक्त वाहतूक सेवा देण्याचे नियोजन केले जात आहे. ही योजना किती यशस्वी होईल हे येणा-या काळात बघायला मिळेल. पण निदान हे प्रयत्न केले जात आहेत, हे वाखाणण्याजोगं आहे. खरंतर प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वच देशांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलणं गरजेचं आहे.

Web Title: Turned bus stops to 'B-Stops' for fresh air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.