तूतनखानूमच्या हजारो वर्ष जुन्या कट्यारीचं रहस्य उलगडलं, अनेक वर्षांपासून वैज्ञानिक घेत होते शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:32 PM2022-03-08T16:32:45+5:302022-03-08T16:37:04+5:30

Tutankhamun Dagger Mystery : गेल्या अनेक वर्षांपासून ही कट्यार वैज्ञानिकांसाठी रहस्य बनली होती. ही कट्यार कुठून आली कारण पृथ्वीवरील लोखंडापासून तर ती तयार केली नव्हती. 

Tutankhamun technologically advanced dagger mystery solved experts claim | तूतनखानूमच्या हजारो वर्ष जुन्या कट्यारीचं रहस्य उलगडलं, अनेक वर्षांपासून वैज्ञानिक घेत होते शोध

तूतनखानूमच्या हजारो वर्ष जुन्या कट्यारीचं रहस्य उलगडलं, अनेक वर्षांपासून वैज्ञानिक घेत होते शोध

googlenewsNext

Tutankhamun Dagger Mystery : जगभरात अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. या गोष्टी हजारो वर्ष जुन्या आहेत आणि यातील अनेक रहस्य असे आहेत जे आजपर्यंत उलगडले गेलेले नाहीत. दुसरीकडे वैज्ञानिक सतत ही रहस्य उलगडण्यासाठी मेहनत करत असतात. अनेक रहस्य त्यांनी उलगडले ज्याबाबत वाचल्यावर सगळेच हैराण होतात. यातील एक रहस्य आहे तूतनखानूमचा खंजीर म्हणजेच कट्यार. ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. गेल्या अनेक वर्षांपासून ही कट्यार वैज्ञानिकांसाठी रहस्य बनली होती. ही कट्यार कुठून आली कारण पृथ्वीवरील लोखंडापासून तर ती तयार केली नव्हती. 

वैज्ञानिकांनुसार, कट्यार बनवण्यासाठी ज्या लोखंडाचा वापर करण्यात आला आहे, ते उल्कापिंडाद्वारे पृथ्वीवर पोहोचलं होतं. हा उल्कापिंड खास प्रकारचा होता. ज्याला ऑक्टोहेड्राइड म्हटलं जातं. उल्कापिंड किंवा ग्रह विज्ञानासंबंधी या रिसर्चचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, चिबा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एका टीमने कट्यारसंबंधी रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक विश्लेषण केले. ज्यात रासायनिक विश्लेषणाचाही समावेश आहे. यातून खुलासा झाला की, ही कट्यार कशी तयार करण्यात आली होती. याआधी २०१६ साली पॅरिसच्या पियरे अॅंड मॅरी क्यूरी यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी अंदाज व्यक्त केला होता की, कट्यार तयार करण्यासाठी एखाद्या उल्कापिंडाच्या लोखंडाचा वापर करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, साधारण १०० वर्षाआधी पुरातत्ववाद्यांना ही कट्यार तूतनखानूमच्या कबरीत सापडली होती. नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, तूतनखानूमच्या लोखंडी कट्यारवर निकेलचा थर चढवण्यात आला होता. त्यासोबतच लोखंडाला कट्यारीची रूप देण्यासाठी  ८०० डिग्री सेल्सिअसवर वितळवण्यात आलं होतं. पण यात हैराण करणारी बाब ही आहे की, त्यावेळच्या लोकांना लोखंड वितळवण्याची प्रक्रियाच माहीत नव्हती. मग कट्यार तयार कशी झाली? या रहस्याचा अजून खुलासा झाला नाही.
 

Web Title: Tutankhamun technologically advanced dagger mystery solved experts claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.