'या' अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:04 PM2022-05-31T16:04:47+5:302022-05-31T16:31:27+5:30

एका तरुण टीव्ही स्टारने एका अशा गोष्टीचा बिझनेस केला आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल. ही सेलेब तरुणी तिचा घाम विकते.

tv star sells sweat and earns 40 lakh per day | 'या' अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

'या' अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

Next

लोक कोणत्या कोणत्या गोष्टींचा बिझनेस करतील याचा नेम नाही. पैसे कमवण्यासाठी काहीजण काहीही करु शकतात. एका तरुण टीव्ही स्टारने एका अशा गोष्टीचा बिझनेस केला आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल. ही सेलेब तरुणी तिचा घाम विकते. कुणाचा घाम कुणी कसा काय विकत घेऊ शकतो? पण तिचे चाहते हा घाम विकत घेतात. तोही १ बॉटल ४० हजार रुपये या दराने. तिच्या घामाला इतकी मागणी आहे की दर दिवसाला ती ४ लाख रुपये कमवते. 

स्टेफनी मॅटो असं या टीव्ही स्टारचं नाव असुन ती स्विमिंग पुलमध्ये गेल्यावर १५ मिनिट तिला इतका घाम येतो की त्यात १ बॉटल आणि जास्त घाम आला तर १० बॉटलही भरतात. तिच्या घामात इतकं काय आहे की तिचे चाहते त्यासाठी इतकी किंमत मोजतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचे उत्तर तिने असे दिले आहे की, तिच्या चाहत्यांना तिच्या घामाचा वास घेतल्यावर ती त्यांच्या जवळच आहे असे वाटते. तिच्या सोबत असण्याचा अनुभव घेता यावा म्हणून चक्क ते तिचा घाम विकत घेतात. 

स्टेफनी म्हणजे घाम जमा करणं हे दिसतं तितकं सोप काम नाही. यासाठी तिला उन्हात स्विमींग पुलच्या जवळ कित्येक वेळ बसावे लागते. जास्तीत जास्त घाम यावा म्हणून ती भरपूर पाणी येते. पण या प्रक्रियेत ती स्वत:ची काळजीही घेते. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करते.

याआधी स्टेफनी तिच्या पोटातील गॅस विकुन पैसे कमवायची पण त्याचा तिला इतका त्रास झाला की तिला हार्ट अटॅक येईल असा इशारा डॉक्टरांनी तिला दिला. त्यानंतर तिने हा घाम विकायचा व्यवसाय सुरु केला. यातुन तिची चांगलीच मिळकत होते.

Web Title: tv star sells sweat and earns 40 lakh per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.