अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 01:57 PM2021-11-13T13:57:18+5:302021-11-13T14:02:54+5:30

गावात बरेच जुळे लोक आहेत, इतके की जगात इतके कुठेच नसतील. हीच या आयलॅंडची खासियत आहे. जर तुम्ही या आयलॅंडवर पोहोचले तर हे नक्कीच की, तुम्ही या लोकांना बघून चक्रावून जाल.

Twins island in Philippines weird village of twins | अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण

अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण

Next

(Philippines Island of Twins) जुळे लोक नेहमीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात. जेव्हा ते गर्दीत निघतात तेव्हा लोक त्यांना वळून वळून बघतात. कारण जुळ्यांना बघणं एक वेगळाच अनुभव असतो. आज आम्ही तुम्हाला फिलिपिन्सच्या एका अशा आयलॅंडबाबत सांगत आहोत, जिथे जुळ्या लोकांची संख्या जास्त आहे. मजेदार बाब  म्हणजे इथे प्रत्येक तिसऱ्या घरात जुळे लोक राहतात.
फिलिपीन्सच्या आयलॅंडवर असलेलं गाव अलबाट मासेमारीसाठी ओळखलं जातं. सोबतच आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. गावात बरेच जुळे लोक आहेत, इतके की जगात इतके कुठेच नसतील. हीच या आयलॅंडची खासियत आहे. जर तुम्ही या आयलॅंडवर पोहोचले तर हे नक्कीच की, तुम्ही या लोकांना बघून चक्रावून जाल.

द सन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, अलबाटमध्ये १५ हजार परिवार राहतात. ज्यातील जुळ्या लोकांच्या साधारण १०० जोड्या आहेत. हैराण करणारी बाब म्हणजे या गावात असं का होतं हे कुणालाच माहीत नाही. इथे ४ महिन्यांच्या बाळापासून ते ८६ वर्षाचे जुळे वयोवृद्धही दिसतात.

गावात राहणाऱ्या एंटोनिया नावाच्या महिलेने वेबसाइटला सांगितलं की, जेव्हा सरूवातीला तिचं लग्न झालं होतं तेव्हा तिचा पती तिच्यात आणि तिच्या बहिणीत कन्फ्यूज झाला होता. अनेकदा तर असंही झालं की, ज्यामुळे दोघांनाही लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला. तेव्हा एंटोनियाने पतीला सांगितलं होतं की, तिच्या नाकावर एक तीळ आहे तर तिच्या बहिणीच्या नाकावर तीळ नाही. 

इथे राहणारे जुळे लोक कपड्यांमुळेही एकसारखे दिसतात. ते नेहमीच एकसारखे कपडे घालतात. रिपोर्टनुसार, येथील महिलांना प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी खास औषधांचं सेवन केलं होतं. ज्यानंतर १९९६ ते २००६ पर्यंत ३५ वर्षापर्यंतच्या महिलांमध्ये मल्टिपल प्रेग्नेन्सीमध्ये १८२ टक्क्यांनी वाढ झाली होती. अजून इथे कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक शोध करण्यात आला नाही, ज्यावरून हे समजेल की, इथे इतके जुळे जन्माला का येतात.
 

Web Title: Twins island in Philippines weird village of twins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.