बाप रे बाप! हुंड्यात अडीच कोटी, तर शूज पळवण्याच्या बदल्यात ११ लाख, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाची एकच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:44 PM2024-12-02T13:44:06+5:302024-12-02T13:44:32+5:30
Jara Hatke News: हुंडा पद्धत बंद झाली असली तरी विविध मार्गांनी तो दिला घेतला जात असतो. दरम्यान, अशाच एका महागड्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हारयल झाला असून, सोशल मीडियावरून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
लग्न सोहळा म्हटला की देवाण घेवाण, मौजमजा ही आलीच. त्यात मागच्या काही काळात विवाह सोहळे हे कमालीचे खर्चिक झाले आहेत. तसेच हुंडा पद्धत बंद झाली असली तरी विविध मार्गांनी तो दिला घेतला जात असतो. दरम्यान, अशाच एका महागड्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हारयल झाला असून, सोशल मीडियावरून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
या विवाह सोहळ्यादरम्यान, सुटकेसमध्ये भरून २ कोटी ५६ लाख रुपयांचा हुंडा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच विवाहात नवरदेवाचा शूज पळवण्याच्या कार्यक्रमातही देण्यात आली रक्कम पाहून अनेक जण अवाक् झालेत. नवऱ्याच्या पळवण्यात आलेल्या शूजच्या बदल्यात ११ लाख रुपये देण्यात आले. ही रक्कम पाहून वधू पक्षालाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याशिवाय आणखी एका प्रथेदरम्यान ८ लाख रुपये देण्यात आले.
दरम्यान, या विवाह सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या व्हिडीओमधील प्रथांमधून लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काही जण ही वैयक्तिक बाब असल्याचे म्हणत आहेत. मात्र लोकमत या व्हिडीओच्या सत्यतेला दुजोरा देत नाही.