दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:32 IST2022-07-01T17:29:40+5:302022-07-01T17:32:37+5:30

Weird Love Story: लाल कुर्ती येथे राहणाऱ्या तरूणीच्या कुटुंबियांना दोन महिन्याआधीच या लग्नाबाबत समजलं. ज्यानंतर कुटुंबिय तिला घरी घेऊन आले.

Two best female friend meerut couple get married | दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग...

दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग...

Weird Love Story: मेरठच्या दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि नंतर त्यांनी लग्नही केलं. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा दोघींना संबंध ठेवताना कुटुंबियांनी बघितलं. त्यांनंतर दोघींनी कोर्ट मॅरेज केल्याचा दावा केला. पण कुटुंबियांना मुलींच्या या लग्नाबाबत समजलं तेव्हा कथितपणे त्यांना मारहाणही केली. मग तरूणी भडकल्या आणि प्रकरण पोलिसांत गेलं. पण तरूणींनी मीडियासमोर येण्यास नकार दिला.

Zee Newsच्या एका वृत्तानुसार, एक तरूणी शास्त्रीनगरमधील आहे तर दुसरी तरूणी मेरठच्या लाल कुर्ती भागातील आहे. दोन्ही तरूणी एकाच कॉलेजमधून बीकॉमचं शिक्षण घेत आहेत. एक वर्षाआधी दोन्ही तरूणी नोएडा येथे नोकरी करण्यासाठी गेल्या होत्या. दोघी सोबतच राहत होत्या. लाल कुर्ती येथे राहणाऱ्या तरूणीच्या कुटुंबियांना दोन महिन्याआधीच या लग्नाबाबत समजलं. ज्यानंतर कुटुंबिय तिला घरी घेऊन आले. दोन्ही तरूणी अभ्यासाचं नाव सांगत जास्त वेळ एकाच रूममध्ये राहत होत्या.

दोन्ही तरूणी एसएसपी ऑफिसच्या बाहेर दिसून आल्या. लाल कुर्ती इथे राहणाऱ्या तरूणीचे कुटुंबियीही शास्त्रीनगरला पोहोचले. आरोप आहे की, दोन्ही तरूणींच्या कुटुंबियांनी दोघींनाही मारहाण केली. या घटनेदरम्यान पोलिसही पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबियांनी तरूणींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्या जे करत आहेत ते चुकीचं होईल, पण कायद्यानुसार यात काहीच चूक नाही. तरूणींना समजावण्यात आलं आणि कुटुंबियही मानले. 

लग्नाबाबत पत्रकारांनी पोलिसांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, 'सांगितलं असंच जात आहे. पण याचा काही पुरावा नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांनी लग्न केलं आहे. पण त्यांनी पोलिसांना याचा कोणताही पुरावा दाखवला नाही'.

Web Title: Two best female friend meerut couple get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.