महिन्याला 2 लाख पगार देतो पण गर्लफ्रेंड हवी; सोशल मीडियावर जाहिरात तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 02:39 PM2022-09-26T14:39:36+5:302022-09-26T14:48:03+5:30

दोन मुलांनी चक्क गर्लफ्रेंडसाठी जाहिरात दिल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर तिला महिन्याला तब्बल दोन लाख रुपये पगाराची ऑफरही दिली.

two boys need girlfriends two lakh rupees per month salary job description | महिन्याला 2 लाख पगार देतो पण गर्लफ्रेंड हवी; सोशल मीडियावर जाहिरात तुफान व्हायरल

महिन्याला 2 लाख पगार देतो पण गर्लफ्रेंड हवी; सोशल मीडियावर जाहिरात तुफान व्हायरल

Next

जगभरात आपल्याला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काहींना आपल्याला हवा तसा पार्टनर अगदी सहज भेटतो. तर काहींना यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. पण हल्ली सोशल मीडियामुळे या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पार्टनर शोधण्यासाठी अनेक डेटिंग साईट्स उपलब्ध आहेत. तसेच विविध प्रकार देखील नव्याने यात सामील होत आहेत. असं असतानाच आता दोन मुलांनी चक्क गर्लफ्रेंडसाठी जाहिरात दिल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर तिला महिन्याला तब्बल दोन लाख रुपये पगाराची ऑफरही दिली.

सोशल मीडियावर गर्लफ्रेंड बनण्याच्या जॉबची जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. थायलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन चिनी मित्रांसाठी ही जाहिरात दिली. आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिने ही जाहिरात पोस्ट केली.  तिने आपल्या ओके माई माई फेसबुक पेजवर गेल्या आठवड्यात ही पोस्ट केली. या पोस्टमध्ये माझ्या दोन चिनी मित्रांसाठी गर्लफ्रेंड शोधत आहे असं म्हटलं आहे. 

गर्लफ्रेंडचं वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असावं. तिला महिन्याला 2.16 लाख रुपये पगार दिला जाईल. जर तिने तिचं काम नीट केलं आणि माझ्या मित्रांना तिचं काम जास्त आवडलं तर तिला पगारापेक्षाही अधिक पैसे मिळतील. दोघंही माझे मित्र आहे. ते अतिशय चांगले आहेत. आता फक्त गर्लफ्रेंड होण्यासाठी महिन्याला दोन लाख रुपये मिळत असतील तर ते सहजासहजी कसे बरे मिळतील. यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या जॉबसाठी इच्छूक असलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज व्यसन नसावं. 

गर्लफ्रेंड कामात चांगली असावी. तिला कोणतीही अडचण किंवा समस्या नसावी आणि महत्त्वाचं म्हणजे तिला चिनी भाषा बोलता यायला हवी, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर थायलँडमधील बऱ्याच महिलांनी या जॉबसाठी अप्लाय केलं. पोस्टवर प्रतिक्रिया देत बऱ्याच महिलांनी आपण या जॉबसाठी इच्छूक असल्याचं सांगितलं.  काहींनी कमेंट बॉक्समध्ये चिनी शब्द वापरत तिथंच  आपल्या चिनी भाषेचं ज्ञानही दाखवलं. तर काहींनी आपल्या मैत्रिणींना ही पोस्ट टॅग केली. thethaiger च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीची पोस्ट आता सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे. कारण गर्लफ्रेंडच्या नोकरीसाठी कँडिडेट मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: two boys need girlfriends two lakh rupees per month salary job description

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.