अर्ध्या रात्री प्रसुतीच्या कळांनी तडफडणाऱ्या 'त्या' महिलेला दोन डॉक्टरांनी दिला नकार अन् मग.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:40 PM2020-04-05T16:40:52+5:302020-04-05T17:09:59+5:30
एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे पत्नीच्या प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या.
(image credit- dainikbhaskar)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांना इन्फेक्शन होण्यापासून वाचवण्यासाठी सर्वच पातळीवर वेगवेगळे उपाय केले जात आहेत. परिस्थिती जास्त हाताबाहेर जाऊ नये यासाठी लॉकडाऊन केलं आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरयोय होत आहे. तर काहींना गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अशाच एका घटनेबदद्ल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुजरातमधील नरोडाच्या एका महिलेला अचानक प्रसुती कळा यायला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल बंद होते. मग ही महिला आणि तिच्या पतीने रात्रीच्या वेळी दोन खासगी गायनॅक डॉक्टरांना डिलिव्हरी करण्याची विनंती केली. पण या दोन्ही डॉक्टरांनी कारणं देत डिलिव्हरी करण्याचं नाकारलं. त्यावेळी डॉक्टर मोहिल पटेल यांचा संपर्क क्रमांक या दापत्याला मिळाला. या डॉक्टरांनी रात्री दीड वाजता या महिलेला दवाखान्यात भरती करून घेतले.
कठवाडा परिसरात राहत असलेले महेश ठाकोर यांची पत्नी आरती हिला शुक्रवारी दुपारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. शहरात लॉकडाऊन असल्यामुळे बरेच हॉस्पिटलस बंद होते. प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असलेल्या खाजगी डॉक्टराशीं संपर्क केल्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मोहिल पटेल यांच्यांशी त्या दाम्पत्यांनी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर १२ वाजता डॉक्टर मोहिल यांनी दवाखान्यात बोलावून घेतले. सोनोग्राफी आणि इतर तपासणी करून रात्री दीड वाजता डिलिव्हरी केली. त्यांतर या बाळाला आयसीयुत ठेवण्यात आलं. या दाम्पत्यांनी एका कन्येला जन्म दिला आहे.
महेश असं सांगतात की, ''आम्ही २७ मार्चला खूप घाबरलेल्या अवस्थेत होतो. कारण एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे पत्नीच्या प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टर मोहिल यांनी एका कॉल वर आमची मदत केली. यासाठी डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नाहीत. आमच्या मुलीला सुखरूप जीवदान देणारे डॉक्टर मोहिल आमच्यासाठी दैवताप्रमाणे आहेत.'' असं ते म्हणाले.