कुत्र्यांना मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा, शेजाऱ्याला चावले म्हणून जीव देऊन चुकवावी लागली किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:16 PM2021-07-13T12:16:54+5:302021-07-13T12:17:32+5:30

पाकिस्तानच्या कराची शहरातील डीएचए भागातील एक वरिष्ठ वकील मिर्झा अख्तर अली सकाळी फिरून घरी परतत होते.

Two dogs gets death sentence for biting senior lawyer in Pakistan | कुत्र्यांना मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा, शेजाऱ्याला चावले म्हणून जीव देऊन चुकवावी लागली किंमत!

कुत्र्यांना मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा, शेजाऱ्याला चावले म्हणून जीव देऊन चुकवावी लागली किंमत!

Next

कुत्र्यांनी मनुष्याला चावल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, अशा घटनांमध्ये कुत्र्यांना जबाबदार धरलं जात नाही किंवा त्यांना शिक्षा दिली जात नाही. कारण तो त्यांचा स्वभाव आहे. मात्र, आपल्या शेजारील देश पाकिस्तानातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका वकिलाला चावा घेतल्याप्रकरणी कुत्र्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरातील डीएचए भागातील एक वरिष्ठ वकील मिर्झा अख्तर अली सकाळी फिरून घरी परतत होते. अशात शेजारी हुमायूं अख्तरचे दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांनी मिर्झा अख्तर यांच्यावर हल्ला केा. ज्यात मिर्झा अली जखमी झाले. त्यांच्या मुलांनी कसंतरी त्यांना कुत्र्यांच्या कचाट्यातून सोडवलं. पण खरा वाद त्यानंतर सुरू झाला. वकील मिर्झा अख्तर अली यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. ज्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं.

पोलिसांनी याप्रकरणी हुमायूं अख्तरच्या दोन नोकरांना अटक केली. तेच हुमांयू अख्तरने अटक होण्यापासून वाचण्यासाठी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. अशात आता दोन्ही पक्षात कोर्टाबाहेरच वाद मिटला आहे. दोन्ही पक्षात झालेल्या करारानुसार हुमायूं खानच्या दोन्ही कुत्र्यांना वेटरनिटी डॉक्टरकडून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. सोबतच हुमायूं खानने मिर्झा अख्तर अलीची विना अट माफी मागितली आणि जर त्याने भविष्यात कोणताही पाळीव प्राणी घरात ठेवला तर त्यांना आधी क्लिफ्टन कॅटोन्मेंट बोर्डाकडे रजिस्टर करावं लागेल आणि दुसरं म्हणजे  ते प्राणी हॅंडलरसोबतच बाहेर येतील.

करारानुसार, हुमायूं खानला १० लाख पाकिस्तानी रूपये स्थानिक अॅनिमल रेस्क्यू सेंटला दान द्यावे लागतील. तेच या संपूर्ण घटनेबाबत चर्चा आहे की, जर मालकाने कुत्र्यांना बांधून ठेवलं असतं तर ही घटना घडली नसती. पण मालकाने केलेल्या चुकीची शिक्षा त्याच्या दोन मुक्या कुत्र्यांना आपली जीव देऊन भोगावी लागली आहे.
 

Web Title: Two dogs gets death sentence for biting senior lawyer in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.