एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:04 PM2021-09-09T13:04:51+5:302021-09-09T13:10:25+5:30
lottery ticket: 5 डॉलरमध्ये विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाने कमवून दिले तब्बल 7 कोटी रुपये.
तुम्ही 'भगवान देता है तो छप्पर फाड के देता है' ही म्हण ऐकली आहे, पण फार कमी लोकांसोबत असं घडतं. पण, ज्यांच्यासोबत अशी घटना घडते, त्यांच्या आयुष्यात अनेक आनंद येतात. अशाच प्रकारची घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे. व्यक्तीला एकाच दिवशी दोन गुड न्यूज मिळाल्या. त्याने आपले नवीन दुकान सुरू केले आणि पहिल्याच दिवशी त्याला तब्बल 7 कोटी रुपये मिळाले.
https://t.co/4bZ0UrBTC5
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
आयएसएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.#snake#viralvideo
ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी लागली लॉटरी
फ्लोरिडातील एका व्यक्तीने नवीन ऑटो शॉप उघडले. त्याचा या दुकानातील पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी त्याची लॉटरी लागली. लॉटरीमध्ये त्याने तब्बल 1 मिलियन डॉलर म्हणजे 7 कोटी रुपये जिंकले. यूपीआय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय ब्रायन वुडल यांनी कॅल्हनमधील सर्कलच्या स्टोअरमधून 5 डॉलरचे गोल्ड रश सुप्रीम स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतले होते. त्यात त्यांना ही लॉटरी लागली.
https://t.co/8QSUtInZxD
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
कॅनडा आणि अमेरिकन एअरलाइन्सने कर्मचाऱ्यांना लस घेण्याचा आदेश जारी केला आहे.#coronavaccine
याबाबत वुडल सांगतात की, मी कधीच लॉटरी जिंकेल याचा विचार केला नव्हता. माझं स्वतःचा ऑटो शॉप असावं, हे स्वप्न होतं आणि मी हे स्वप्न पूर्ण केलं. माझ्या नवीन दुकानाचा पहिलाच दिवस होता. दुकानातील काही सामान आणण्यासाठी बाजारात गेले होतो, तेव्हा सहजच एक लॉटरी तिकीट काढले. या मी पैसे जिंकेल असे वाटले नव्हते, पण मी या लॉटरीतील सर्वोच्च रक्कम जिंकली. आता या पैशांना दुकान वाढवण्यासाठी वापरेल.