देशातील असे रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:28 AM2023-07-24T09:28:00+5:302023-07-24T09:28:45+5:30
Indian Railway: तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत नेहमीच वेगवेगळी इंटरेस्टींग माहिती समोर येत असते. अशीच एक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तशी तर याबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दोन असे स्टेशन आहेत जे देशाच्या अगदी शेवटी आहेत.
तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील शेवटच्या रेल्वे स्टेशनबाबत सांगायचं तर एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे, तर दुसरं पश्चिम बंगालमध्ये आहे. अररियातील जोगबनी स्टेशनला देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं कारण इथे रेल्वेतून उतरून तुम्ही चालत चालत नेपाळमध्ये जाऊ शकता.
पश्चिम बंगालचं सिंहाबाद स्टेशनही देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. दक्षिण भारतात जिथे समुद्री सीमा सुरू होते, तेथील एका स्टेशनला सुद्धा देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागातील सिंहाबाद स्टेशन देशातील शेवटचं स्टेशन आहे.
हे स्टेशन बांग्लादेशच्या सीमेच्या जवळ आहे. इंग्रजांच्या शासन काळात त्यांनी हे स्टेशन बनवलं होतं. हे स्टेशन बांग्लादेशच्या इतक्या जवळ आहे की, लोक काही किमी दूर चालत पायी बांग्लादेशमध्ये पोहोचू शकतात. या स्टेशनचा जास्तीत जास्त वापर मालगाड्यांसाठी केला जातो.