या देशात प्रत्येक पुरूषाला करावी लागतात दोन लग्न, पहिली पत्नीही यावर काही बोलत नाही; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:54 PM2023-02-04T16:54:14+5:302023-02-04T16:54:48+5:30
Marriage Rules : या देशात कायद्यानुसार पुरूषाला दोन्ही पत्नी करणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीवर केसही करू शकते. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही मिळू शकते.
Marriage Rules : लग्नाला एक पवित्र बंधन मानलं जातं. भारतात सद्या एका रिपोर्टची चांगलीच चर्चा सुरू आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, 20 लाखांपेक्षा जास्त पती किंवा पत्नी आपल्या पार्टनरला दगा देतात. अशात आम्ही तुम्हाल अशा एका देशाबाबत सांगणार आहोत जिथे लग्नाबाबत अजब कायदा आहे. या देशात कायद्यानुसार पुरूषाला दोन्ही पत्नी करणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीवर केसही करू शकते. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही मिळू शकते.
रिपोर्ट्सनुसार, इरीट्रिया जे आफ्रिकेतील महद्वीपांमध्ये आहे. इथे प्रत्येक पुरूष दोन लग्ने करतो. ज्या पुरूषांना हे करायचं नसतं, त्यांनाही जबरदस्ती दोन लग्ने करावी लागतात. जर एखादा पुरूष दोन लग्ने करण्यास नकार देतो त्याच्यावर कोर्टात केस चालते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षाही दिली जाते.
इरीट्रियामध्ये एक अनोखा कायदा करण्यात आला आहे. या कायदा तयार करण्यामागे काही कारण आहे. या देशात महिलांची संख्या जास्त आहे. तेच पुरूषांची संख्या कमी आहे. असं झालं कारण हा देश इथियोपियासोबत गृह युद्धात अडकला आहे.
पुरूषांना लग्न करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय महिलांसाठीही कठोर कायदे आहेत. जर एखादी महिला पतीला दोन लग्न करण्यापासून रोखत असेल तर तिलाही तुरूंगात जावं लागू शकतं. याच कारणाने पती, पत्नी आणि दुसरी पत्नी यांच्यात काही वाद होत नाहीत.
या कायद्यामुळे या देशावर इतर अनेक देशांनी टीका केली. लोकांचं मत आहे की, असं जगातल्या कोणत्याही देशात होत नसेल. हेच नाही तर लग्नाच्या कायद्याशिवाय इथे असे अनेक कायदे आहेत जे फार अजब आहेत. ज्यावर लोक नेहमीच बोलत असतात.