एकाच महिलेवर दोन लोकांनी केला पत्नी असल्याचा दावा, महिला म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 04:08 PM2024-01-13T16:08:24+5:302024-01-13T16:09:07+5:30
सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील. पण रिअल लाइफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती 1300 किलोमीटर दूरून तिथे पोहोचला.
प्रेम किंवा अनैतिक संबंधाच्या अनेक विचित्र घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण एक अशी घटना समोर आली आहे जी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून 165 किलोमीटर दूर पलामू जिल्ह्यातील एका शहरातील ही घटना आहे. इथे दोन वेगवेगळ्या लोकांनी एकाच महिलेवर आपली पत्नी असल्याचा दावा केला आहे.
सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील. पण रिअल लाइफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती 1300 किलोमीटर दूरून तिथे पोहोचला. पलामू जिल्ह्याता एका पत्नीवर दोन पतींचा दावा असल्याची घटना सध्या चर्चेत आहे. महिला बिहारची राहणारी आहे. पण तिचं सासर झारखंड आणि हरयाणात आहे. ही घटना समोर आली जेव्हा हरयाणाहून पती आपल्या पत्नीच्या शोधात पलामूला पोहोचला.
हरयाणामध्ये राहणाऱ्या पतीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती. तेच बिहारच्या नवीनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचं प्रेम प्रकरण मेदिनीनगरमध्ये राहणाऱ्या नेपाळीसोबत होतं. ज्यानंतर काही वर्षानी दोघांनी लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यानंतर तरूणी हरयाणाला गेली होती. तिथे तिने सुरेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यांना मुलेही झाली आणि त्यांचा संसार आनंदात सुरू होता.
महिला काय म्हणाली?
यादरम्यान, महिलेचा पहिला पती नेपाळीच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला बघण्यासाठी महिला हरयाणाहून पलामूला आली होती. अचानक पत्नी गायब झाल्याने सुरेंद्र हरयाणा पोलिसात एक तक्रार दाखल केली. नंतर सुरेंद्र स्वत: पत्नीच्या शोधात पलामूला पोहोचला.
इथे येताच सुरेंद्रला त्याच्या पत्नीच्या पहिल्या लग्नाबाबत समजलं. नंतर तो पत्नीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे दोन्ही तरूण महिलेवर आपली पत्नी असल्याचा दावा करत होते. तेच तरूणी म्हणाली की, हरयाणात ती सुरेंद्रच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत लग्न केलं. यावर पोलीस म्हणाले की, ते या घटनेची चौकशी करत आहेत.