दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 10:40 AM2023-12-05T10:40:25+5:302023-12-05T10:41:01+5:30
प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात.
दोन नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं पाणी एक होतं. पण आज आम्ही तुम्हाला दोन अशा नद्यांबाबत सांगणार आहोत ज्या वाहतात सोबत पण त्यांचं पाणी कधीच मिक्स होत नाही. एकीचं पाणी पांढरं तर दुसरीचं काळं दिसतं. जे बघून एखाद्या चमत्कारासारखं वाटतं. या नद्यांबाबत वेगवेगळ्या कथाही प्रचलित आहेत. आम्ही तुम्हाला सांगतोय जॉर्जियातील अरागवी नदीबाबत (Aragvi River Georgia).
प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आश्चर्याची बाब म्हणजे असं म्हणतात की, वैज्ञानिकही आतापर्यंत या नदीचं रहस्य उलगडू शकलेले नाहीत. सायंटिस्ट सांगतात की, दोन्ही पाण्यांचं घनत्व आणि तापमान वेगवेगळं आहे. ज्यामुळे एक लाइन तयार होते. जी पाण्याला एक होऊ देत नाही.
पण एका कहाणीनुसार, नद्यांचं पाणी मिक्स न होण्यामागे 2 बहिणींची प्रेम कहाणी आहे. दोन्ही नद्या गोरी आणि श्यामला नावाच्या बहिणी आहेत. एक सोनेरी केसांची आणि दुसरी काळ्या केसांची. दोघीही एका बहादूर शूरवीराच्या प्रेमात पडल्या. नंतर त्या व्यक्तीने गोऱ्या बहिणीला निवडलं. अशात काळे केस असणाऱ्या बहिणीला वाटलं की, तिच्यामुळे आपल्या बहिणीच्या आनंदात अडचण येऊ नये. म्हणून तिने घाटात उडी घेतली. तेव्हापासून दोघी सोबत वाहत आहेत.
Aragvi River in Georgia 🇬🇪..
— kakha japaridze (@KakhaJaparidze) September 27, 2023
The Aragvi River originates in the Greater Caucasus Mountains in northern Georgia and flows southward. It's divided into two major tributaries: the White Aragvi and the Black Aragvi.
The "Black Aragvi" refers to the upper, mountainous portion of… pic.twitter.com/1QnKoboZQz
2 प्रेमींची कहाणी
या नद्यांबाबत आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. या भागात एक श्रीमंत व्यक्ती राहत होती. त्याच्या मुलीचं नाव तमर होतं. जी आपल्या सौंदर्यासाठी लोकप्रिय होती. ती लाशा नावाच्या एका गरीब मुलाच्या प्रेमात पडली. लाशा नदी किनारी मेंढ्याना चारा खाऊ घालण्यासाठी घेऊन जात असे. एक दिवस तमरच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं. जेव्हा हे तिला समजलं तेव्हा तिने लाशासोबत पळून जाण्याचं ठरवलं. तेव्हात अरागवी नदीत एक मोठं वादळ आलं.
तमर आणि लाशा यांची छोटी नाव नदीत उलटली. ज्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेव्हापासूनच दोघे असे वाहतात. असंही म्हटलं जातं की, गंगा नदीप्रमाणेच या नदीच्या पाण्यामुळे अनेक आजार ठीक होतात. रात्री नदीचं पाणी चमकतं. लोक यात आंघोळ करतात.