दरवाजे उघडे असताना अचानक सुुरु झाली लिफ्ट, अवघ्या २ महिन्यांच्या बाळाचा आईसमोरचं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:39 PM2021-08-13T16:39:21+5:302021-08-13T16:41:09+5:30

लिफ्टमध्ये अडकून एका दोन महिन्याच्या लहान बाळाचा (two months baby)आपल्या आईच्या डोळ्यांसमोर दुर्देवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना (Horrific Incident) समोर आली आहे. (Baby Crushed By a Lift) या महिलेनं आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती अपयशी ठरली.

two year old baby crushed in the lift in front of mother and got dead | दरवाजे उघडे असताना अचानक सुुरु झाली लिफ्ट, अवघ्या २ महिन्यांच्या बाळाचा आईसमोरचं मृत्यू

दरवाजे उघडे असताना अचानक सुुरु झाली लिफ्ट, अवघ्या २ महिन्यांच्या बाळाचा आईसमोरचं मृत्यू

Next

लिफ्टमध्ये अडकून एका दोन महिन्याच्या लहान बाळाचा (two months baby)आपल्या आईच्या डोळ्यांसमोर दुर्देवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना (Horrific Incident) समोर आली आहे. (Baby Crushed By a Lift) या महिलेनं आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती अपयशी ठरली.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार,या आईचं नाव गुलपेरी करसाल असून ती आपल्या बाळाला प्रॅममधून घेऊन लिफ्टमध्ये शिरत होती. अपार्टमेंटची लिफ्ट उघडताच महिलेनं लिफ्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्त्यासाठी तिनं आपल्या प्रॅममध्ये असलेल्या बाळाला लिफ्टमध्ये लिफ्टमध्ये चढवलं. मात्र, पुढे ती आत शिरण्याच्या आक लिफ्ट वरती जाऊ लागली. लिफ्टसोबतच प्रॅमदेखील वरती जाऊ लागलं. मात्र, भिंत आणि लिफ्टच्या मध्ये अडकल्यानं ते पूर्णपणे तुटलं. 

महिला प्रॅम पकडून खाली ओढण्याचा प्रयत्न करत राहिली, मात्र लिफ्टच्या ताकतीपुढे ती काहीच करू शकली नाही. यानंतर अचानक बाळ लिफ्टच्या शाफ्टमधून २० फूट खाली कोसळलं. गुलपेरी करसाल बाळाला घेऊन रुग्णालयातही पोहोचल्या. मात्र, तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता.

ही भयंकर घटना बिल्डिंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी सांगितलं की घटनेच्या वेळी गुलपेरी करसालनं आसपासच्या फ्लॅटमधील लोकांकडे मदतही मागितली, मात्र बाळाला वाचवता आलं नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे.

Web Title: two year old baby crushed in the lift in front of mother and got dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.