UFO एक्सपर्टचा मोठा दावा, या ग्रहावर आहे एलियन्सचा ठिकाणा; नासा लपवून ठेवत आहे मोठं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:28 PM2022-01-19T16:28:53+5:302022-01-19T16:29:03+5:30
वैज्ञानिकांना जाणून घ्यायचं आहे की, खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? त्यासोबत वैज्ञानिक UFO बाबतही शोध घेत आहेत. आता एका UFO शोधकर्त्याने मोठा दावा केला आहे.
एलियन्सबाबत (Aliens) दररोज नवनवीन दावे केले जातात. जगभरातील वैज्ञानिक एलियन्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वैज्ञानिकांना जाणून घ्यायचं आहे की, खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? त्यासोबत वैज्ञानिक UFO बाबतही शोध घेत आहेत. आता एका UFO शोधकर्त्याने मोठा दावा केला आहे. याचा दावा आहे की, मंगळ ग्रहावर (Aliens on Mars) एलियन्सचा बेस आहे. त्यांनी लाल ग्रहावर २५ किमी रूंद एलियन्सचा बेस शोधला आहे. त्यांचं मत आहे की अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा एलियन्सच्या या बेसची माहिती जगापासून लपवत आहे.
या वैज्ञानिकाचं नाव स्कॉट वारिंग आहे. त्यांनी UFO आणि एलियन्सच्या जीवनावर वेगवेगळे रिसर्च लिहिले आहेत. स्कॉट वी वारिंग म्हणाले की, मंगळ ग्रहावर एक आयाताकृती आकाराची वस्तू बघण्यात आली आहे. या फोटोत ही वस्तू ग्रे कलरची दिसत आहे.
स्कॉट वारिंग म्हणाले की, त्यांनी मंगळ ग्रहावर एलियन्सच्या २५ किलोमीटर रूंद बेस शोधला आहे. मंगळ ग्रहावर हे स्थान सुल्सी गोर्डीच्या डाव्या बाजूला आहे. वारिंग म्हणाले की, अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाला ही बाब जगापासून लपवायची आहे.
एलियन्सबाबत जगभरातील लोक वेगवेगळे दावे करतात. काही लोकांनी दावा केला आहे की, एलियन्स पृथ्वीवर UFO ने येतात. वेळोवेळी एलियन्स असण्याबाबत दावे केले जातात. पण अजूनपर्यंत एलियन्स असण्याचे पुरावे सापडले नाहीत.
याआधी एका यूएफओ रिसर्चरने अंटार्कटिकामध्ये एक सीक्रेट बेस आढळून आल्याचं सांगितलं होतं. त्यांनी हा शोध गूगल अर्थच्या माध्यमातून लावला होता. ते म्हणाले होते की, एलियन्सने हा बेस बनवला आहे. यावर रिसर्च करणाऱ्या काही वैज्ञानिकांनी दावा केला होता की, नासाला एलियन्सबाबत सगळं काही माहीत आहे.