'हा माझा बायको'... त्याच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं, त्याला शेजाऱ्यांकडून कळलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:49 PM2020-01-16T12:49:03+5:302020-01-16T12:56:59+5:30
लग्नांसंबंधीचे वेगवेगळे विचित्र किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार तो किस्सा फारच वेगळा आहे.
लग्नांसंबंधीचे वेगवेगळे विचित्र किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार तो किस्सा फारच वेगळा आहे. आफ्रिकेतील युगांडा देशातील एका इमामाने लग्न केलं आणि लग्नाच्या दोन आठवड्यांनंतर त्याला हे समजलं की, त्याने ज्या मुलीसोबत लग्न केलं ती मुलगी नसून पुरूष आहे. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या धक्कादायक गोष्टीचा खुलासा त्याच्या शेजाऱ्यामुळे झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीच्या शेजाऱ्यांनी खुलासा केला की, त्याची पत्नी एक स्त्री नसून पुरूष आहे. शेजाऱ्याने आरोप लावला की, या व्यक्तीची 'पत्नी' भिंतींवरून त्यांच्या घरात शिरली आणि तिने टीव्ही, कपडेसहीत काही वस्तू चोरी केल्या. ही घटना शेजाऱ्यांनी इमामाला सांगितली आणि पोलिसातही तक्रार दाखल केली.
नंतर इमाम आणि त्याच्या 'पत्नी'ला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. यावेळी महिलाचं रूप घेतलेल्या पुरूषाणे हिजाब आणि सॅंडल घातली होती. त्यामुळे तुरूंगात डांबण्याआधी एका महिला कॉन्स्टेबलने त्याची झडती घेतली. त्यानंतर हा आश्चर्यकारक खुलासा झाला. महिला कॉन्स्टेबलला धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला कळाले की, ज्या महिलेची महिला समजून झडती घेत होती ती महिला नसून एक पुरूष आहे.
आता या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड झाला तेव्हा इमामाला चांगलाच धक्का बसला. मुळात लग्नानंतरचे दोन आठवडे इमामाने 'पत्नी'सोबत संबंधच ठेवले नसल्याने त्याला त्याचं खरं रूप कळू शकलं नाही. 'पत्नी' मासिक पाळी असल्याचं कारण देत संबंध ठेवण्याचं टाळलं होतं.
पण सगळंकाही समोर आल्यावर महिला बनलेल्या पुरूषाने हे मान्य केलं की, इमामाकडून पैस काढण्यासाठी त्याने लग्न केलं. इमामाने नंतर सांगितले की, दोघांची भेट एका मशिदीत झाली होती. त्याला बघताच 'ती' आवडली होती. नंतर दोघांनी लगेच लग्न केलं. या घटनेनंतर इमामाला पदावरून काढण्यात आलं आणि आरोपी पुरूषाला अटक करण्यात आलीये.