40 वर्षांच्या या महिलेने १८ वर्षात दिला ४४ बाळांना जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 12:05 PM2018-10-18T12:05:55+5:302018-10-18T12:08:54+5:30
मरियम नाबटेंजीचं वय ४० वर्ष आहे. ती युगांडातील मुकोनो जिल्ह्यातील राहणारी आहे. या महिलेला आफ्रिकेतील मोस्ट फर्टाइल वुमन म्हटलं जातं.
मरियम नाबटेंजीचं वय ४० वर्ष आहे. ती युगांडातील मुकोनो जिल्ह्यातील राहणारी आहे. या महिलेला आफ्रिकेतील मोस्ट फर्टाइल वुमन म्हटलं जातं. याचं एक खास कारण म्हणजे मरियमने गेल्या १८ वर्षात तब्बल ४४ मुला-मुलींना जन्म दिला.
मरियमच्या गावातील लोक तिला नालोंगो मुजाला म्हणतात. याचा अर्थ जुळी आई जी चार बाळांना जन्म देऊ शकते. ४० वर्षात ती १८ वेळा गर्भवती राहिली. दरम्यान मरियमने सहा वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला. चारदा तिला तीन-तीन बाळं झालीत आणि तीनदा तिने चार-चार बाळांना जन्म दिला.
पण ४४ पैकी मरियमचे केवळ ३८ मुलं-मुली जिवंत आहेत. सर्वजण एकाच परिवारात राहतात. मरियमचा पती रोजगारासाठी परिवारापासून दूर राहतो आणि कधी कधी घरी येतो. अशात परिवाराचं पोट भरण्याचं काम मरियम एकटीच करते. मरियम जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिचं लग्न २८ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लावण्यात आलं होतं.
मरियमने युगांडातील 'डेली मॉनिटर' या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'जेव्हा मी १३ वर्षांची होती तेव्हा पहिल्यांदा गर्भवती झाले होते. त्यावेळी मी जुळ्या बाळांना जन्म दिला. एका वर्षानंतर मी तीन बाळांना जन्म दिला आणि त्यानंतर पुन्हा एका वर्षाने मी चार बाळांना जन्म दिला. लोकांनी ही फार आश्चर्याची बाब वाटते, पण हे माझ्यासाठी आश्चर्याचं नाही. कारण माझ्या वडिलांना ४५ मुलं बाळं होती'.
मरियम २३ वर्षांची होती तेव्हा तिचे २५ मुलं बाळं होते. त्यानंतर ती रुग्णालयात गेली. तेव्हा माहिती पडलं की, तिचे एग्स काऊंट जास्त आहे. मरियमचा हा बाळांना जन्म देण्याचा सिलसिला ४४ व्या बाळानंतर २०१६ मध्ये थांबला. आता तिचा पती कधी कधीच घरी येतो. मरियम आता परिवाराचं पोट भरण्यासाठी मजूरी, जडीबूटी आणि महिलांचं मेकअप करुन देण्याची कामे करते.
मरियमने सांगितले की, 'प्रत्येक दिवशी घरात १० किलो कणिक खर्च होते. ४ किलो साखर आणि तीन साबणं लागतात. देवाची कृपा आहे की, आजपर्यंत माझा परिवार कधी उपाशी राहिला नाही'.