फुकटात सिनेमा बघा पण अट फक्त एकच जी आहे फारच विचित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 07:30 PM2022-07-20T19:30:03+5:302022-07-20T19:30:29+5:30

घराबाहेर पडून एसीमध्ये मोफत बसण्याची संधी शक्यतो कोणीही सोडणार नाही; मात्र त्या सिनेमा हॉलने यासाठी एक अट ठेवली आहे. सिनेमा पाहायला येणाऱ्यांच्या केसांचा रंग लाल असावा, (Free Movie For Red Hair people) असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सरसकट सगळ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये.

UK Cinema to Offer Free Entry to People Amid Heatwave But There’s a Catch | फुकटात सिनेमा बघा पण अट फक्त एकच जी आहे फारच विचित्र

फुकटात सिनेमा बघा पण अट फक्त एकच जी आहे फारच विचित्र

Next

सध्या आपल्या देशात पावसाळी हंगाम सुरू आहे. त्यामुळे हवेत गारवा आला आहे. ब्रिटनमध्ये मात्र हा उन्हाळ्याचा (Summer) काळ आहे. यंदा तर तिथे उन्हाचा कहरच झालाय. बऱ्याच ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मॉल, समुद्रकिनारे, सिनेमा हॉल, हॉटेल्स अशा सगळ्या ठिकाणी गर्दी प्रचंड होतेय. अशातच ब्रिटनमधल्या एका थिएटरनं नागरिकांना तीन तासांच्या चित्रपटासाठी विनामूल्य तिकीट (Free Ticket For Movie) देण्याची ऑफर दिली आहे. घराबाहेर पडून एसीमध्ये मोफत बसण्याची संधी शक्यतो कोणीही सोडणार नाही; मात्र त्या सिनेमा हॉलने यासाठी एक अट ठेवली आहे. सिनेमा पाहायला येणाऱ्यांच्या केसांचा रंग लाल असावा, (Free Movie For Red Hair people) असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सरसकट सगळ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये.

युनायटेड किंगडम अर्थात यूकेमध्ये सध्या तापमानानं 40 अंशांचा आकडा पार केला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तिथे जुलै महिन्यातलं तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असायचं. सध्या मात्र ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळेच नागरिक सध्या स्विमिंग पूल, वॉटर पार्क, सिनेमा हॉलमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. म्हणून ब्रिटनमधल्या शोकेस सिनेमानं नागरिकांना सिनेमा हॉलमध्ये मोफत प्रवेश करण्याची संधी दिली आहे; मात्र त्यासाठी अट आहे, की तिथे येणाऱ्यांचे केस लाल असले पाहिजेत. लालव्यतिरिक्त अन्य रंगांचे केस असणाऱ्यांना सिनेमा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ही अट पूर्ण करणाऱ्यांना सुपरहिट चित्रपट मोफत पाहता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिथल्या लोकांना उकाड्याचा खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांना थंड वातावरणात बसण्याची संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं शोकेस सिनेमाचे (Showcase Cinemas) जनरल मॅनेजर मार्क बार्लो (Mark Barlow) यांचं म्हणणं आहे. मिररच्या वृत्तानुसार, सोमवारी आणि मंगळवारी ब्रिटनमधले नागरिक या संधीचा लाभ घेऊ शकतात. लाल रंगाच्या केसांवर सूर्यकिरणांचा वाईट परिणाम होतो, असं म्हणतात. लाल रंगाचे केस असणाऱ्या व्यक्ती कडक उन्हातून फिरल्या, तर त्यांच्या केसांना त्रास होऊ शकतो. केस खराब होऊ शकतात. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन त्यांना ही ऑफर देण्यात आली आहे.

सिनेमा हॉलच्या या संधीचा नागरिक किती फायदा घेतील हे सांगता येणार नाही; मात्र सध्या केस रंगवण्याचा ट्रेंड पाहिल्यास लाल रंगाचे केस असणारेही अनेक जण असू शकतील. तसंच हल्ली झटपट केस रंगवता येतात. त्यामुळे गारवा मिळण्यासाठी अनेक जण मोफत सिनेमा हॉलचा पर्याय निवडू शकतात. बिझनेस चालण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. ब्रिटनमधला उन्हाचा पारा चढलेला असताना ग्राहकांना थंडावा देण्यासाठी सिनेमा हॉलनं लढवलेली ही शक्कल किती कामी येईल, हे ग्राहकच ठरवतील.

Web Title: UK Cinema to Offer Free Entry to People Amid Heatwave But There’s a Catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.