UK : आधी दारू प्यायली, मग Viagra घेतली; जोशात कपलचं भान हरपलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 04:47 PM2022-10-30T16:47:37+5:302022-10-30T16:49:10+5:30
...नंतर जे झाले, ते हे कपल कधीच विसरू शकणार नाही.
ब्रिटनमध्ये आपल्या आयुष्याच्या एका महत्वाच्या आणि विशेष दिवशी उत्साहाच्या भरात एका कपलचे भान हरपले. यानंतर, त्यांच्या सोबत जे झाले, ते हे कपल कधीच विसरू शकणार नाही. व्हरपूलमध्ये राहणारे एक जोडपे यावर्षी त्यांची तिसरी अॅनिव्हरसरी सेलिब्रेट करण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. या दोघांनीही सेलिब्रेशनची जबरदस्त तयारी केली होती. महत्वाचे म्हणजे, या दिवशी या दोघांनीही उत्साहाच्या भरात जबरदस्त दारू घेतली आणि नंतर व्हियाग्राची (Viagra) ऑनलाइन ऑर्डर केली.
होटेलमध्ये बुक केली होती रूम -
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, रॉब अॅन्ड्रू (Rob Andrews) आणि त्याची 25 वर्षांची गर्लफ्रेंड इजाबेल वूल्फ (Isabella Woolf) यांनी आपली थर्ड अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी जबरदस्त तयारी केली होती. यासाठी त्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी शहरापासून दूर एका होटेलची रूमही बुक केली होती. येथे म्यूझिक आणि लायटिंगची व्यवस्थाही करण्यात आली होती. आपला स्पेशल दिवस सुपर स्पेशल बनवण्यासाठी ते हॉटेलमध्ये बरे सामानही घेऊन गेले होते.
रुपग्णालयात पोहोचल्यानंतर या कपलने सांगितले, की त्यांनी काही तासांतच दारूच्या तीन बाटल्या संपवल्या. यानंतर व्हियाग्रा खाल्ल्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. यानंतर निवांत आणि खासगी क्षणाच्या वेळी बॉयफ्रेंडला दुखापत झाली. या घटनेत बॉयफ्रेंड रॉबचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. यानंतर तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घाबरू नका उपचार घ्या -
या घटनेनंतर रॉबवर बरेच दिवस उपचार झाले. डॉक्टरांनी त्याला बरेच सल्ले देत डिस्चार दिला. खरे तर, प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या घटना क्वचितच घडतात. पण, अनेक वेळा लाजेपोटी लोक रुग्णालयात जात नाहीत. मात्र, अशी चूक करणे घातक ठरू शकते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. याच बरोबर, सेक्स करताना अनेकवेळा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या घटना समोर येतात. 2021 मध्येही यूकेमध्येच एका व्यक्तीसोबत अशीच घटना घडली होती. यासंदर्भात, ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये रिपोर्टदेखील प्रकाशित करण्यात आला होता.