बाबो! हनीमूनसाठी गेलेल्या कपलने दारुच्या नशेत विकत घेतलं हॉटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:55 PM2018-10-11T16:55:09+5:302018-10-11T17:38:45+5:30

कदाचित तुम्ही कधी हे ऐकलं नसेल की, एखादं कपल हनीमूनसाठी गेलं आणि ज्या हॉटेलमध्ये ते थांबले ते हॉटेल त्यांनी रातोरात विकत घेतलं.

UK couple gets drunk on honeymoon, buys hotel in Sri lanka | बाबो! हनीमूनसाठी गेलेल्या कपलने दारुच्या नशेत विकत घेतलं हॉटेल!

बाबो! हनीमूनसाठी गेलेल्या कपलने दारुच्या नशेत विकत घेतलं हॉटेल!

Next

कदाचित तुम्ही कधी हे ऐकलं नसेल की, एखादं कपल हनीमूनसाठी गेलं आणि ज्या हॉटेलमध्ये ते थांबले ते हॉटेल त्यांनी रातोरात विकत घेतलं. ऐकायला हे जरा फारच विचित्र वाटत असलं तरी ब्रिटनच्या एका कपलने हा कारनामा केला आहे. 

ब्रिटनच्या या कपलने हनीमूनसाठी श्रीलंका निवडलं. इथे आल्यावर त्यांनी नशेत असे काही केले की, ती घटना त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात राहील. या कपलने नशेत तेच हॉटेल खरेदी केलं ज्यात ते थांबले होते. पण दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर त्यांना त्यांची चुकी कळाली.

नशेत या कपलसोबत झालेली ही घटना सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या कपलचं लग्न यावर्षी जूनमध्ये झालं होतं. त्यांनी श्रीलंकेला हनीमूनसाठी जाण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील तंगालेमध्ये गेलेल्या कपलची बातमी मिररमध्ये प्रकाशित झाली. या बातमीनुसार, हॉटेलमध्ये पहिल्या रात्रीच त्यांनी १२ ग्लास रम सेवन केली, त्यानंतर त्यांनी हॉटेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. 

मीडिया रिपोर्टनुसार, या कपलने हॉटेल ३० हजार पाऊंड(२९ लाख रुपये) खरेदी केलं होतं. मिररसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर बसून रम घेत होतो तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की, या हॉटेलचा करार लवकरच संपणार आहे. जेव्हा आम्ही हॉटेलची डील केली तेव्हा हे हॉटेल आम्हाला १० हजार पाऊंडमध्ये मिळणार होतं. तेव्हाचं आम्ही हे हॉटेल घेण्याचा विचार केला. 

View this post on Instagram

त्यांनी सांगितले की, आम्ही त्यावेळी नशेत होतो आणि आम्ही हॉटेलची डील फायनल केली. आम्ही हॉटेलच्या बदल्यात मालकाला ३० लाख रुपये देण्याची ऑफर दिली आणि मालकाने ही ऑफर लगेच मान्यही केली. 

Web Title: UK couple gets drunk on honeymoon, buys hotel in Sri lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.