कुत्र्याने खाल्ले टेबलवरील 3 लाख रूपये, बघतच राहिलं कपल; असे काढले अडीच लाख!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:00 AM2024-01-06T10:00:30+5:302024-01-06T10:01:19+5:30

33 वर्षीय कॅरी लॉ नावाच्या महिलेने सांगितलं की, कशाप्रकारे त्यांचा डॉगी सेसिलने किचन काउंटवरवर ठेवलेल्या पैशांवर उडी मारली.

UK dog ate couple's 3 lakh rupee cash go through poo to recover money | कुत्र्याने खाल्ले टेबलवरील 3 लाख रूपये, बघतच राहिलं कपल; असे काढले अडीच लाख!

कुत्र्याने खाल्ले टेबलवरील 3 लाख रूपये, बघतच राहिलं कपल; असे काढले अडीच लाख!

यूकेमधील एका कपलसोबत जे झालं ते कधीही विसरू शकणार नाहीत. ही घटना घरात पाळीव प्राणी असणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे. या कपलच्या डॉगीने त्यांचे 4 हजार डॉलर म्हणजे 3.32 लाख रूपये चावून खाल्ले आणि कपल हा तमाशा बघतच राहिले. 33 वर्षीय कॅरी लॉ नावाच्या महिलेने सांगितलं की, कशाप्रकारे त्यांचा डॉगी सेसिलने किचन काउंटवरवर ठेवलेल्या पैशांवर उडी मारली.

कपल घरातील कामात बिझी होतं. तेव्हा अचानक कॅरीचा पती क्लेटन ओरडून म्हणाला - बघ सेसिल काय करतोय? कॅरी म्हणाली की, तो नजारा बघून मला केवळ केवळ हार्ट अटॅक येणंच बाकी राहिलं होतं. ती म्हणाली की, आम्ही एका खास कामासाठी जॉइंट अकाऊंटमधून पैसे काढले होते आणि किचनच्या काउंटरवर ठेवून अर्धा तासही झाला नव्हता. सेसिलने काही मिनिटात ते चावून गिळले.

नंतर कपलने बराचवेळ डॉगीच्या दातांमधून नोटांचे तुकडे काढण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी त्यांनी सेसिलचं पोट साफ होण्याची वाट बघितली आणि त्याच्या पॉटीमधून नोटांचे तुकडे शोधले. कॅरी म्हणाली की, आम्ही त्याच्या पॉटीमधून नोटांचे तुकडे काढून काढून धुतले. फार कमी नोटा होत्या ज्या पूर्ण होत्या. सुदैवाने बॅंक अशा पूर्ण नोटा स्वीकारण्यास तयार आहे ज्यांचे सीरिअल नंबर दिसत आहेत.

कॅरी म्हणाली की, आम्ही तासंतास नोटांचे तुकडे धुवत होतो आणि एखादा भाग सापडला तर आनंदाने उड्या मारत होतो. ती गमतीने म्हणाली की, आम्ही कधी विचारही केला नव्हता की, पॉटीमधून नोटा शोधून धुण्याची वेळ येईल. दरम्यान त्यांना एकूण 450 डॉलर म्हणजे 37 हजार रूपये गमवावे लागले तर बाकी पैसे, सीरिअल नंबर असलेल्या नोटा त्यांना बॅंकेला देण्यासाठी मिळाल्या.

Web Title: UK dog ate couple's 3 lakh rupee cash go through poo to recover money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.