3 दिवस जमिनीखालून येत होता आवाज, ६० तासांनंतर वाचवण्यात आला कुत्र्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:27 PM2022-03-03T16:27:14+5:302022-03-03T16:30:05+5:30
UK Dog rescued : कुत्रा जमिनीखाली दबल्याचं मालकाला दिसलं. त्याने लगेच रेक्स्यू टिमला संपर्क केला. कुत्र्याला बाहेर काढल्यावर मालकाने त्याचे लाड केले.
UK Dog rescued : जगात अनेकदा अशा घटना घडतात ज्यावरून आजही माणूसकी जिवंत असल्याचं दिसतं. आजकाल लोक आपल्याच लोकांचा जीव घेतात अशात यूकेमध्ये एका रेस्क्यू टीमने सतत ६० तासांच्या प्रयत्नांनंतर जमिनीखाली दबलेल्या एका कुत्र्याचा जीव वाचवला. ६० तासांनंतर कुत्र्याला बाहेर काढलं तेव्हा रेस्क्यू टिमच्या जीवात जीव आला. कुत्रा जमिनीखाली दबल्याचं मालकाला दिसलं. त्याने लगेच रेक्स्यू टिमला संपर्क केला. कुत्र्याला बाहेर काढल्यावर मालकाने त्याचे लाड केले.
फायर फायटरच्या टिमने तीन दिवसांपर्यंत कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. हा कुत्रा घराजवळच्या मैदानात खेळत होता. तेव्हाच तेथील एका खड्ड्यात असा काही अडकला की, त्याला बाहेर येताच येत नव्हतं. त्याच्या मालकाने त्याला बाहेर काढण्यासाठी बराचवेळ प्रयत्न केला. पण अनेक प्रयत्न करूनही कुत्र्याला बाहेर काढता न आल्यावर त्याने रेस्क्यू टिमला फोन केला. रेस्क्यू टिमला जमिनीखालून सतत कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज येत होता. त्या आधारावरच खोदकाम सुरू करण्यात आलं.
टिमे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक प्रकारचे लोकेटिंग डिवाइसचा वापर केला. यानंतर टिमने जमिनीवर छिद्र करून कुत्र्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ६० तासांमध्ये एक वेळ अशीही आली की कुत्र्याने कोणत्याही प्रकारचा सिग्नल देणं बंद केलं. तेव्हा टिमला वाटलं की कुत्रा जीवनाची लढाई हरला. यानंतर अचानक त्याने पुन्हा भूंकणं सुरू केलं. त्यानंतर टिमने पुन्हा काम सुरू केलं.
अनेक तास चाललेल्या जीवन आणि मृत्यूच्या या लढाईत कुत्र्याने बाजी मारली आणि टिमने त्याला सुरक्षित बाहेर काढलं. या रेस्क्यूवेळी सर्वात मोठी भीती ही होती की, ड्रिल करताना कुत्र्याला काही नुकसान पोहोचू नये. अखेर सुरक्षितपणे कुत्र्याला वाचवण्यात आलं.